मराठी कलाविश्वातील चॉकलेट बॉय अभिजीत खांडकेकरने अनेक मालिका, चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेपासून ते आता स्टार प्रवाहवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेपर्यंतचा प्रवास काही सोप्पा नव्हता. अभिजीतला अनेक संकटांना सामोरं जावं लागलं. भार्गवी चिरमुलेच्या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्याने बालाजी फिल्म्सचा अनुभव शेअर केला आहे. पहिल्या मालिकेदरम्यान त्याला कशी वागणूक मिळाली, याबद्दल तो स्पष्टच बोलला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिजीतचा बालाजी फिल्म्सचा अनुभव कसा होता? असं विचारलं असता अभिजीत म्हणाला, “पहिली मालिका आणि मी पूर्णपणे प्रोडक्शन हाऊसला दोष देणार नाही. कारण या सगळ्यात अनेक लोकांचा वेगवेगळ्या स्तरावर समावेश असतो. एखाद्या प्रोडक्शन हाऊसमध्ये शेवटी तुम्हाला कशी वागणूक दिली जाते हे सगळं या गोष्टींवर अवलंबून असतं.”

हेही वाचा… “मी मुस्लीम कुटुंबातला आहे म्हणून…”, ‘दंगल’च्या शूटदरम्यान आमिर खानला समजलं हात जोडून नमस्कार करण्याचं महत्त्व

“पहिल्या मालिकेच्या वेळी आम्हाला काही काही बाबतींमध्ये फारच वाईट पद्धतीने वागवण्यात आलं. खूप कमी पैशांमध्ये काम करून घेण्यात आलं, जे त्यातल्या त्यात ठीक आहे; कारण तो एक व्यवसायाचा भाग आहे आणि आता रडून काही उपयोग नाही. त्याच मालिकेने आम्हाला प्रसिद्धी मिळवून दिली, पण तरीसुद्धा अगदी लहान सहान गोष्टींपासून जेव्हा तुम्हाला त्रास होतो तेव्हा असं वाटत की चांगली वागणूक दिली पाहिजे. इंडस्ट्रीच्या नियमांनुसार जे काही आहे त्यात चांगल्या पद्धतीचं जेवण आलं, चांगल्या पद्धतीची वागणूक आली तर या अनेक गोष्टी झाल्या नाहीत. मला माहीत नाही कसं, पण माझ्यामध्ये ते धैर्य कुठून आलं मला माहीत नाही, पण त्यावेळेस मी त्या विरोधात आवाज उठवला होता. मी बोललो होतो. त्या त्या वेळेस मी त्यांना सुनावलं होतं. कारण आधी मला कॉर्पोरेटचा अनुभव असल्यामुळे मला माहीत होतं की हे चुकीचं आहे.”

“मला सगळं मान्य आहे की तुम्ही आम्हाला संधी देताय, जेणेकरून आमचं पुढे करिअर घडेल. पण, याचा अर्थ असा नाही की आम्ही कोणाचे गुलाम आहोत. जो कलाकार तुमच्यासाठी १३-१३ तास काम करतोय, त्याला तुम्ही सामान्य पातळीवरच्या काही गोष्टी देऊ नयेत, तर ते मला अजिबात मान्य नव्हतं. एकूणच वागणूक आणि अनुभव बघता तो काही आनंददायी नव्हता.”

हेही वाचा… “मी असाच पळत सुटलो होतो”, पीकेमधल्या ‘त्या’ न्यूड सीनबद्दल आमिर खानने केला खुलासा, म्हणाला…

“मी तेव्हाही, आजही आणि आयुष्यात कायम संजय मोने, सुहिता थत्ते, शीतल शुक्ल, हर्षदा खानविलकर यांचे आभारी असेन. त्या काळामध्ये ज्या ज्या ज्येष्ठ मंडळींनी आम्हाला सांभाळून घेतलं त्यांचा खरच मी ॠणी आहे. ते बघायचे आम्ही खूप मरमर करून काम करतोय. माझ्या रुममेट्सने तीन महिन्याचं भाडं नाही घेतलं माझ्याकडून, कारण मी कधी यायचो कधी जायचो याचा काही पत्ताच नसायचा. तेव्हा जेवणाचे वांदे होते. त्या काळात या लोकांनी आमच्यासाठी घरून डब्बे आणलेत. दोनवेळचे जेवणाचे वांदे असताना या लोकांनी आम्हाला घरचं खायला आणलं.”

हेही वाचा… “…तर माझं नावच बदला”, ‘ही’ मराठी अभिनेत्री करणार दहा दिवसांत पाच किलो वजन कमी; व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

“आम्हाला असं वाटत होतं की, दोन वेळेचं जेवणपण मिळू शकणार नाही का आम्हाला नीट? बाहेर तुम्ही स्टार म्हणून आम्हाला मिरवता ना, भले मोठे होर्डिंग्स लावता. मी नंतर चॅनेललाही तक्रार केली होती. एशियातल्या पहिल्या नंबरच्या म्हणवल्या जाणाऱ्या प्रोडक्शन हाऊसला याप्रकारची वागणूक देताना लाज नसेल वाटत का? किंवा त्यांना माहितीच नसेल कदाचित.”

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abhijeet khandkekar had a bad experience working with balaji telefilms during maziya priyala preet kalena dvr