Bigg Boss Marathi Season 5 : अवघ्या नऊ दिवसांवर ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा महाअंतिम सोहळा येऊन ठेपला आहे. त्यामुळे सर्व प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. प्रत्येक जण आपल्या आवडत्या सदस्यांना भरभरून मत करताना दिसत आहेत. अलीकडेच एक विकिपीडियाचा फोटो व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये अभिजीत सावंत विजेता असल्याचं दाखवण्यात आलं आहे. अशातच अभिजीतच्या एका चाहतीने केदार शिंदे, ‘कलर्स मराठी’ला पत्र लिहिलं आहे; जे सध्या व्हायरल झालं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – Video: “बिग बॉस तुम्ही खूप पक्षपाती आणि घाणेरडा खेळ खेळताय”, मराठी अभिनेत्री ‘तो’ टास्क पाहून संतापली, म्हणाली…

अभिजीत सावंतच्या चाहतीने पत्रात काय लिहिलं आहे?

अभिजीतची एक फॉलोअर…

आदरणीय,

एंडेमोल शाइन इंडिया, केदार सर, बिग बॉस मराठी पाच पर्व, ‘कलर्स मराठी’ यांस

पत्रास कारण की, सूरजला जरी खूप व्होट मिळाले तरी, अभिजीतने खेळ खूप प्रामाणिकपणे, माणूसकी जपून, राजनैतिक मार्ग वापरून असा बहुआयामी खेळ खेळला आहेस. बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता हा ‘अभिजीत’च असला पाहिजे. सूरज हा विजेता आहे; लोकांच्या हृदयाचा, सूरज आणि अभिजीत दोघेही माणूस म्हणून चांगलेच आहेत. पण कर्तृत्व सिद्ध ‘अभिजीत’ने केलं आहे.

एकच विनंती आहे, यावेळेस विजेता ‘अभिजीत’च असला पाहिजे. सूरजसाठी तुम्ही एक प्रोजेक्ट वेगळा करू शकता. जिथे लोक ऑनलाइन पैसे पाठवतील आणि यातून सूरजला त्याचं घर बांधण्यासाठी मदत होईल. पण ‘अभिजीत’बरोबर कोणताही अन्याय होऊ देऊ नका. ही विनंती.

अभिजीतची एक फॉलोवर.

हेही वाचा – “हिंदू मुलीच्या प्रेमात पडलास, तर २ लग्न करणार का?” अरबाज पटेल म्हणाला, “आमच्या धर्मात चार…”

हेही वाचा – वडिलांना पाहताच अश्रूंचा बांध फुटला! धनंजयच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष; आई अन् पत्नीला पाहिल्यावर केलं असं काही…; पाहा व्हिडीओ

चाहतीच्या या पत्रावर अभिजीत सावंतने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने लिहिलं आहे, “हे प्रेम मिळून खरंच धन्य आहे.” दरम्यान, या आठवड्यात सर्व सदस्यांना ‘बिग बॉस’ने नॉमिनेट केलं आहे. त्यामुळे या आठवड्यात कोण घराबाहेर होतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण त्यानंतर ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा अंतिम आठवडा सुरू होणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abhijeet sawant fan wrote letter to kedar shinde and colors marathi channel pps