Abhijeet Sawant First post after Bigg Boss Marathi Season 5 finale: सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरला. तर गायक अभिजीत सावंत उपविजेता ठरला. बिग बॉसच्या विजेत्याची घोषणा झाल्यावर अभिजीत सावंतने पहिली पोस्ट केली आहे. अभिजीतने प्रेक्षकांचे आभार मानत भावना व्यक्त केल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“या ७० दिवसांत सर्वांनी मला खूप सपोर्ट केला आणि प्रचंड प्रेम दिलं. तसेच मतंही दिलीत. माझ्या बिग बॉसच्या प्रवासात मला सपोर्ट करणाऱ्या प्रत्येकाचे मी आभार मानतो,” अशी पोस्ट अभिजीत सावंतने केली आहे. “मंडळी…शब्दात व्यक्त नाही करू शकत मला जे वाटतंय ते…इतके नॉमिनेशन्स इतके वोट्स आणि इतकं प्रेम! एका कलाकाराला फक्त प्रेक्षकांचं प्रेम आणि पाठिंबा हवा असतो आणि मागच्या ७० दिवसांत तुम्ही सगळ्यांनी तो मला भरभरून दिलात! खूप खूप धन्यवाद!” असं कॅप्शन अभिजीतने या पोस्टला दिलं आहे.

Bigg Boss Marathi 5: ९ लाख रुपये घेऊन खेळ सोडल्यावर जान्हवी किल्लेकरची पहिली पोस्ट, म्हणाली, “७० दिवसांच्या…”

अभिजीत सावंत टॉप २ मध्ये पोहोचला होता. पण ट्रॉफीवर सूरज चव्हाणने नाव कोरलं. बिग बॉसची ट्रॉफी सूरज चव्हाण जिंकला असला तरी आनंद असल्याचं अभिजीत म्हणाला. काहींनी अभिजीत सावंतच विजेता व्हायला हवा होता, असं म्हटलं. तर काहींनी उपविजेता ठरलेल्या अभिजीतचं अभिनंदन केलं आहे.

Bigg Boss Marathi Winner : ‘गुलीगत धोका’ म्हणत सूरज चव्हाण ठरला पाचव्या पर्वाचा महाविजेता!

भारतातील पहिला इंडियन आयडॉल असलेला मराठमोळा अभिजीत सावंत बिग बॉस मराठीच्या घरात ७० दिवस उत्तम खेळला. त्यानंतर टॉप २ मध्ये पोहोचला. मात्र प्रेक्षकांची मतं सूरजला जास्त मिळाल्याने तो या शोचा विजेता ठरला व अभिजीत उपविजेता ठरला आहे. शोच्या विजेत्याची घोषणा झाल्यावर होस्ट रितेश देशमुखने या दोघांबरोबरचे सेल्फी शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या.