Bigg Boss Marathi 5 वे पर्व संपले असले तरीही यामध्ये सहभागी झालेले स्पर्धक विविध कारणांमुळे आजही चर्चेत आहेत. आता अभिजीत सावंतने एका मुलाखतीत बिग बॉसचा विजेता घोषित झाल्यानंतर त्याच्या मुलींची प्रतिक्रिया काय होती, यावर वक्तव्य केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अभिजीत सावंतने सांगितली मुलींची प्रतिक्रिया
अभिजीत सावंतने नुकतीच ‘लोकशाही मराठी फ्रेंडली’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी त्याला विचारण्यात आले की, बिग बॉसच्या घरात जेव्हा एक व्हिडीओ दाखवला होता, त्यात तुझी धाकटी मुलगी म्हणाली होती की इंडियन आयडॉल जिंकलास तेव्हा आम्ही नव्हतो; पण आता बिग बॉसची ट्रॉफी जिंकताना आम्हाला तुला पाहायचंय. तर त्यांची शोनंतर प्रतिक्रिया काय होती? आणि त्यांना गाण्यात आवड आहे का? कारण तू त्यांचा गाण्याचा सराव घेतानाचे व्हिडीओ आम्ही पाहतो. यावर बोलताना त्याने म्हटले, “दोघींना म्युझिकमध्ये आवड आहे, त्यामुळे आता फक्त मी त्यांना शिकवतोय. कारण जर उद्या त्यांना प्रोफेशन म्हणून गाणे निवडायचे असेल तर त्या तयार असल्या पाहिजेत. पण, त्यांचा अभ्याससुद्धा चांगला आहे. लहान मुलगी जास्त ॲक्टिव्ह आहे. मोठी माझ्यासारखी आहे, जास्त शांत असते. पण, तीचं ती काम व्यवस्थित करते, त्यामुळे ते कॉम्बिनेशन चांगलं आहे.”
पुढे बोलताना त्याने म्हटले, “ज्यावेळी बिग बॉसचा विजेता घोषित केला त्यावेळी मी त्यांनाच बघत होतो, कारण ते कसं घेतील किंवा या गोष्टी त्या कशा पद्धतीनं स्वीकारतील असं मला वाटत होतं. पाच मिनिटांसाठी त्यांना वाईट वाटलं, निराशा होती; पण त्यानंतर त्या व्यवस्थित झाल्या. मलाच टेन्शन आलं की इतकं कसं तुम्ही नॉर्मल घेतलं”, असे अभिजीतने म्हटले आहे.
दरम्यान, जेव्हा रितेश देशमुखने बिग बॉसच्या घरात जात स्पर्धकांना सरप्राइज दिलं होतं; अभिजीतला आहना आणि स्मिरा यांचा व्हिडीओ दाखवला होता, त्यावेळी तो भावूक झाल्याचे पाहायला मिळाले होते. याबरोबरच फॅमिली वीकमध्ये अभिजीतची पत्नी आणि दोन मुलींनी घरात हजेरी लावली होती, यावेळी या मुलींनी प्रेक्षकांचे मन जिंकले होते. उपविजेता ठरलेला अभिजीत सावंत विविध कारणांमुळे सध्या चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे.