Bigg Boss Marathi 5 व्या पर्वाला सुरू होताच घरात दोन गट पडले होते. टीम ए आणि टीम बी, असे हे दोन गट होते. या दोन्ही गटांमध्ये सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून वादविवाद, भांडणे होत असल्याचे दिसत होते.

टीम एमध्ये निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, वैभव चव्हाण, अरबाज पटेल, घनश्याम हे सदस्य होते. काही काळानंतर या टीममध्ये फूट पडलेली दिसली. हा ग्रुप हळूहळू नाहीसा झाला. तर, टीम बीमध्ये धनंजय पोवार, अंकिता वालावलकर, पंढरीनाथ कांबळे, सूरज चव्हाण, योगिता चव्हाण, आर्या आणि इतर सदस्य होते. आता बिग बॉसच्या पाचव्या पर्वाचा उपविजेता ठरलेल्या अभिजीत सावंतने घरात वेगळा ग्रुप तयार झाला असता, असे एका मुलाखतीदरम्यान म्हटले आहे.

zee marathi three serial time slot change
२३ डिसेंबरपासून ‘झी मराठी’वर होणार मोठा बदल! ३ मालिकांच्या वेळा बदलल्या, ‘ही’ सिरीयल होणार बंद, तर नवीन मालिका…
sidharth shukla mother rita celebrated son birth anniversary video viral
Video: सिद्धार्थ शुक्लाच्या आईने दिवंगत लेकाचा ‘असा’ साजरा…
reshma shinde cooked this food items for first time in pavans home
रेश्मा शिंदेचा नवरा आहे साऊथ इंडियन; सासरी गेल्यावर पहिला पदार्थ कोणता बनवला? म्हणाली, “सांबर राइस अन्…”
lagira zala ji fame mahesh jadhav purva shinde rahul magdum played banjo in Kiran Gaikwad And Vaishnavi Kalyankar Wedding
Video: किरण-वैष्णवीच्या सप्तपदीला ‘लागिरं झालं जी’मधील कलाकारांनी वाजवला बँन्जो, पाहा व्हिडीओ
Marathi actress Chaitrali Gupte exit from ashok mama serial
‘अशोक मा.मा.’ मालिकेतून ‘या’ अभिनेत्रीची एक्झिट, सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती, म्हणाली…
bigg boss marathi fame actress dances on pushpa 2 peelings song
“फ्लावर समझा क्या…”, म्हणत मराठी अभिनेत्रींचा ‘पुष्पा २’च्या गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “सोना-मोना…”
Lagira Zala Ji boys team best wishes to Kiran Gaikwad And Vaishnavi Kalyankar for their marriage
“ना शितली, ना जयडी…”, किरण गायकवाड-वैष्णवी कल्याणकरला ‘लागिरं झालं जी’च्या टीमने लग्नाच्या दिल्या हटके शुभेच्छा
tharala tar mag fame actor mayur khandge started new initiative
“शेतकऱ्यांसाठी एक पाऊल पुढे…”, ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्याचा स्तुत्य उपक्रम; पोस्टद्वारे दिली महत्त्वाची माहिती
saara kahi tichyasathi fame actor abhishek gaonkar why change wife name after wedding
‘सारं काही तिच्यासाठी’ फेम अभिषेक गावकरने लग्नानंतर बायकोचं नाव का बदललं? वाचा किस्सा

काय म्हणाला अभिजीत सावंत?

बिग बॉस मराठी ५ नंतर अभिजीत सावंतने ‘अल्ट्रा मराठी बझ’ला मुलाखत दिली. यावेळी त्याला विचारण्यात आले की, शेवटच्या दोन आठवड्यांत तू गेम बदललास. सुरुवातीपासूनच तुझी निक्कीबरोबर मैत्री होती. पण, अरबाज बिग बॉसच्या घरातून बाहेर गेल्यानंतर तुमची मैत्री जास्त दिसली. हा गेमचा प्लॅन होता की ही मैत्रीच होती? याबाबत बोलताना अभिजीतने म्हटले, “माझा गेमचा प्लॅन असा कधी नव्हताच. मी तिच्याबरोबर कधीच गेमबद्दल बोललो नाही. जर बिग बॉसचे हे पर्व अजून लांबले असते, तर निक्की, जान्हवी व मी असा वेगळा ग्रुप बनवला असता किंवा तो ए ग्रुप तयार झाला असता; पण ती संधी आम्हाला मिळाली नाही. आता मी सांगू शकतो की, जवळजवळ तो ग्रुप तयार झाला होता. आम्ही तिघे एकत्र आलो होतो; पण, तो गेम पुढे घेऊन जाऊ शकलो नाही.”

पुढे अभिजीतने म्हटले, “ज्या प्रकारे डीपी आणि अंकिताला माझ्या काही गोष्टी आवडत नव्हत्या. ते माझ्याबद्दल बोलत होते, त्यामुळे मी त्यांच्यापासून लांब गेलो होतो. गोष्टी हाताबाहेर चालल्या होत्या. विचार जुळत नव्हते. ज्या प्रकारे सूरजला वागवले जात होते, तेदेखील मला चुकीचे वाटत होते.”

हेही वाचा: Bigg Boss Marathi: जान्हवी किल्लेकरला जाऊबाई म्हणाली, “मी घरात येऊन तुला मारलं असतं…”

याबरोबरच मी निक्कीच्या कोणत्याही चुकीच्या गोष्टीला पाठिंबा दिला नाही. मला असं वाटायचं की, मी पाठिंबा दिला नाही पाहिजे. दोन्ही टीममधील लोक चुका करायचे, असेही अभिजीतने म्हटले आहे.

दरम्यान, अभिजीत सावंत या पर्वाचा उपविजेता ठरला आहे. आपल्या वागण्याने त्याने प्रेक्षकांची मने जिंकली. जंटलमेन असेही त्याला म्हटले गेले. आता अभिजीत सावंतची बिग बॉसनंतर पुढची वाटचाल कशी असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Abhijeet Sawant reveals that reason of differences with team b If the show had been extended I would have teamed up with Nikki and Janhavi nsp 98

Abhijeet Sawant, अभिजीत सावंत, janhavi killekar, nikki tamboli, निक्की तांबोळी, entertainment, मनोरंजन,bigg boss marathi 5, बिग बॉस मराठी ५,

Story img Loader