गायक अभिजीत सावंत(Abhijeet Sawant) ‘बिग बॉस मराठी ५’व्या पाचव्या पर्वात सहभागी झाला होता. आता हे पर्व संपले तरी यामध्ये सहभागी झालेले सदस्य मुलाखतीमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे आणि सोशल मीडियावर शेअर करत असलेल्या पोस्टमुळे चांगलेच चर्चेत आहेत. आता अभिजीत सावंतने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळे त्याची चर्चा होताना दिसत आहे.
अभिजीत सावंतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. सोशल मीडियावर वेगवेगळ्या भन्नाट पोझ दिलेले फोटो त्याने शेअर केले आहेत. हे फोटो त्याने कोलाज केले असून या पोस्टला ‘कधीतरी मी फक्त आनंदी असतो’, अशी कॅप्शन दिली आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे, बिग बॉस मराठी ५ व्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणचा झापूक झुपूक हा डायलॉग असलेले गाणे लावले आहे.
आता अभिजीत सावंतने शेअर केलेल्या या पोस्टला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे. नेटकऱ्यांनी अनेकविध प्रतिक्रिया देत अभिजीत सावंतचे कौतुक केले आहे.
काय म्हणाले नेटकरी?
एका नेटकऱ्याने म्हटले, “इतके वेडेवाकडे तोंड करूनही हा गोडच दिसतो”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने अभिजीतचे कौतुक करत लिहिले, “बाईSSS हा काय प्रकार, गोड गोड आणि फक्त गोड” एका नेटकऱ्याने अभिजीतला प्रेमळ म्हणत लिहिले, “सूरजने येडं केलं दादा तुलासुद्धा, एक नंबर भाऊ, खूप प्रेमळ आहेस तू.” एका नेटकऱ्याने वय फारच कमी दिसत असल्याचे म्हटले आहे. या पोस्टवर प्रतिक्रिया देताना एका चाहत्याने लिहिले, “टॉपच्या स्पर्धकांनी गाण्यांची अदलाबदल केली आहे.”
सूरज चव्हाणने अभिजीत सावंतच्या गाजलेल्या मोहब्बते लुटाऊंगा या गाण्यावर रील शेअर केले होते. त्याला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळताना दिसत होती. आता अभिजीत सावंतने त्याच्या फोटोसाठी सूरजचे झापूक झुपूक गाणे लावत त्याचे फोटो शेअर केले आहे. त्याच्या या फोटोंवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होताना दिसत आहे.
दरम्यान, बिग बॉस मराठी ५ व्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण ठरला असून अभिजीत सावंत उपविजेता झाला. तिसऱ्या स्थानावरून निक्की तांबोळीला घराबाहेर पडावे लागले होते. घराबाहेर पडल्यानंतर मुलाखतींमधून सूरज आणि अभिजीत सावंत यांनी एकमेकांचे कौतुक केले केल्याचे पाहायला मिळाले. सूरजची भूमिका असलेला ‘राजा राणी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. आता अभिजीत सावंत कोणत्या नवीन प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.