‘इंडियन आयडल’च्या पहिल्या पर्वाचा विजेता अभिजीत सावंत सध्या ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व गाजवतं आहे. या पर्वात अभिजीत सावंतने खेळाडू वृत्तीने, त्याच्या स्वभावाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळेच नेहमी नॉमिनेशमध्ये असणाऱ्या अभिजीतला प्रेक्षक भरभरून व्हॉट करून ‘बिग बॉस’मधून बाहेर जाण्यापासून वाचवताना दिसत आहेत. अशातच अभिजीत सावंतने दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या भेटीचा सांगितलेला किस्सा चांगलाच चर्चेत आला आहे. या भेटीत नेमकं काय घडलं? वाचा…

अभिजीत सावंतने ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या भेटीचा किस्सा सांगितला. यावेळी अभिजीतला विचारलं की, ‘इंडियन आयडल’चा विजेता म्हणून जेव्हा तुझं नाव जाहीर झालं होतं तेव्हा ही अफवा आली होती की, ‘सोनी टीव्ही’वर शिवसेनेने दबाव आणला आणि त्यामुळे अभिजीत सावंतचं नाव विजेता म्हणून घोषित केलं. हे तू ऐकलं आहेस का? तुला त्याबद्दल आता काय म्हणायचं आहे? यावर अभिजीत म्हणाला, “मला नाही वाटतं, असं काही झालं असेल. पण मी विजेता झाल्यानंतर मातोश्रीवर गेलेलो. बाळासाहेब ठाकरेंनी मला घरी बोलावलेलं. त्यांना कलाकारांची खूप आवड आहे ना. त्यामुळे त्यांच्या घरातल्या वरच्या मजल्यावर आम्ही सगळे बसलो. त्यांनी मला उद्देश दिले. काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, याविषयी बोललो.”

maharashtra poll 2024 ubt chief uddhav thackeray finally managed to convince sudhir salvi
शिवडीतील सुधीर साळवींची समजूत; उद्धव ठाकरेंशी चर्चा, अजय चौधरींना सहकार्य करण्याचे आश्वासन
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Zeeshan Siddique slams Uddhav Thackeray
झिशान सिद्दिकींच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी दिला उमेदवार; खोचक पोस्टमध्ये म्हणाले, “सुना है पुराने दोस्तों ने…”
sadanand tharwal left uddhav shiv sena in dombivli
ठाकरे गटाचे डोंबिवलीतील सदानंद थरवळ यांचा शिवसेनेला रामराम
What Kiran Pavasakar Said About Uddhav Thackeray?
Shivsena Vs MNS : “उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंबरोबरचं नातं जपायला हवं होतं आणि…”, ‘या’ नेत्याची बोचरी टीका!
amit thackeray
“…तेव्हा माझ्या पोटात गोळा आला”; उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया!
avinash Jadhav anand ashram
उमेदवारी जाहीर होताच मनसेचे अविनाश जाधव आनंद आश्रमात
uddhav Thackeray
उद्धव ठाकरेंवर बावनकुळेंची टीका; म्हणाले, “आज तीच वेळ…”

हेही वाचा – Video: “पाण्यात ताज ताज म्हावरं…”, ‘स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२४’ सोहळ्यात तेजश्री प्रधानने घेतला भन्नाट उखाणा, व्हिडीओ आला समोर

“तसंच त्यांनी पूर्ण कुटुंबाला बोलावलं होतं. संपूर्ण ठाकरे कुटुंब माझ्यासमोर उभं होतं. बाळासाहेबांमी माझी कुटुंबातील सदस्यांबरोबर ओळख करून दिली. माझ्याबरोबर आई-वडील होते. आम्ही ज्यांना मतदान करायचो, ज्यांना आम्ही तारणहार समजायचो, महाराष्ट्राचं चांगलं हेच करणार, असं म्हणायचो. तेच आपले आवडते नेते ते आम्हाला ओळख करून देतायत. हा बघा, हा हे आहे, अशी नाव घेऊन ते ओळख करून देत होते. तो एक वेगळाच अनुभव होता,” असं अभिजीत म्हणाला.

हेही वाचा – Video : आदित्य आणि पारू देणार प्रीतमच्या प्रेमाला साथ पण…; नेमकं काय घडणार? पाहा नवा प्रोमो

अभिजीतने उद्धव ठाकरेंचा सांगितलेला मजेशीर किस्सा वाचा…

पुढे अभिजीतने उद्धव ठाकरेंचा मजेशीर किस्सा सांगितला. तो म्हणाला, “माननीय उद्धव ठाकरेंनी मला त्यांचा अनुभव सांगितला. ते म्हणाले, “आम्ही ना काय करायचो. आमची मिटिंग वगैरे चालू असायची आणि मिटिंगमध्ये आमची चर्चा असायची. तेव्हा मी तुझ्यासाठी खिशातला हळूच मोबाइल काढून तुला मत करायला जायचो.”

“पण असं काही नव्हतं की त्यांनी वाहिनीवर दबाव आणला. तसं मग सगळ्यांनीच दबाब टाकला असता. राहूलसाठी तर जास्त दबाव टाकायला पाहिजे होता. तो पण मराठीचं आहे. त्यात त्याच्याकडे आधी स्टार व्हॅल्यूव क्वॉलिटी होती,” असं स्पष्ट अभिजीत सावंत म्हणाला.