‘भाबीजी घर पर हैं’ या मालिकेत अंगूरी भाभी ही भूमिका साकारून अभिनेत्री शुभांगी अत्रेला खूप लोकप्रियता मिळाली. शुभांगी गेल्या वर्षी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली. शुभांगी पती पियुष पूरेपासून वेगळी झाली. आता ती पतीपासून घटस्फोट घेणार नसल्याचं वृत्त ‘हिंदुस्थान टाइम्स’ने दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शुभांगी आणि पियुषचे लग्न २००३ साली इंदूरमध्ये झाले होते आणि २००५ मध्ये त्याना मुलगी झाली होती. ‘एचटी’ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, “एक वेळ अशी होती जेव्हा या जोडप्याने त्यांचं नातं सुधारण्याचा व त्यांच्या लग्नाला दुसरी संधी देण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना त्यात यश आलं नाही. आता एकत्र ते राहू शकत नाही, या निर्णयावर ते पोहोचले आहेत. पण त्यांना घटस्फोटाच्या प्रक्रियेत पुढे जायचं नाही.”

खूपच साधं आयुष्य जगतो आमिर खानचा लेक, जुनैद खान काय काम करतो? जाणून घ्या

“ते वेगळे झाले आहेत आणि त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत. पण कायदेशीर औपचारिकतेबद्दल बोलायचं झाल्यास त्यांचा कायदेशीररित्या वेगळे होण्याचा विचार नाही. कारण त्यांची मुलगी संपूर्ण कायदेशीर गोष्टींच्या मध्ये असावी असं त्यांना वाटत नाही. ते त्यांच्या मुलीसाठी पालक म्हणून एकमेकांशी संपर्कात आहेत आणि त्यांना पुढेही असंच राहायचं आहे,” असं सूत्राने सांगितलं. दरम्यान, याबाबत स्वतः शुभांगी किंवा तिच्या पतीने कोणतंही भाष्य केलेलं नाही. त्यामुळे या निव्वळ चर्चा आहे की खरं ते येत्या काळातच कळेल.

माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने यांचं मराठी ऐकलंत का? म्हणाले, “माझं मराठी…”

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दुसऱ्या लग्नाबाबत विचारलं असता शुभांगी म्हणाली, “मला वाटत नाही की मी आयुष्यात पुन्हा कोणावर प्रेम करू शकेन. आता मी हे करू शकणार नाही. आता माझं कामच माझा जोडीदार आहे. रिलेशनशिपसाठी मी आयुष्यातील सर्व मार्ग बंद केले आहेत.”

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: According to reports shubhangi atre will officially not take divorce from husband for daughter hrc