अभिनेते-सुत्रसंचालक आदेश बांदेकर कायमच चर्चेत असतात. झी मराठी वाहिनीवरील ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाचे तर लाखो चाहते आहेत. या कार्यक्रमाद्वारे ते महाराष्ट्रभर फिरत असतात. सगळ्यांचे लाडके भावोजी आजवर महाराष्ट्रातील प्रत्येक घरात प्रसिद्ध आहेत. आदेश आपल्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे कुटुंबियांबरोबरचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करताना दिसतात. त्यांनी आताही असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे.
आदेश यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे त्यांच्या वडिलांचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आदेश यांचे वडील जुनी कविता बोलताना दिसत आहेत. आजही तितक्याच स्फुर्तीने वडिलांना कविता बोलताना पाहून आदेशही खूश झाले.
पाहा व्हिडीओ
आदेश यांनी व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, “माझे वडील चंद्रकांत यशवंत बांदेकर ही आमच्या कुटुंबाची उर्जा. ९०व्या वर्षी त्यांच्या शाळेतल्या कविता त्यांना आजही मुखोद्गत. नमस्कार त्यांच्या स्मरणशक्तीला.” कोंबडा’ ही कविता चंद्रकांत बांदेकर बोलताना दिसत आहेत.
“कुणा आवडतो मोर पिसाऱ्याचा, असे कोणाला छंद कोकिळेचा, कुणी असतो नादिष्ट पोपटाचा, मला आहे परि नाद कोंबड्याचा” असे या कवितेचे बोल आहेत. चंद्रकांत बांदेकर यांना वयाच्या ९०व्या वर्षीही त्यांच्या शाळेतील कविता आठवते. आदेश यांच्या वडिलांचं सगळेच जण कौतुक करत आहेत. या व्हिडीओला नेटकरी अधिकाधिक पसंती देताना दिसत आहेत.