सध्या हिंदी टेलिव्हिजनवरील एक लोकप्रिय अभिनेता खूप चर्चेत आला आहे. या चर्चेचं कारण आहे, त्यानं सांगितलेला एक प्रसंग. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये या लोकप्रिय अभिनेत्यानं ट्रेनमध्ये त्याच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा खुलासा केला. या घटनेनंतर त्यानं ट्रेनचा प्रवास करणं बंद केलं. नेमकं अभिनेत्याबरोबर काय घडलं होतं? जाणून घ्या…

हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेता आमिर अलीबरोबर ट्रेनमध्ये हा धक्कादायक प्रसंग घडला होता. आजपर्यंत हा प्रसंग आमिर विसरू शकलो नाही. या प्रसंगामुळे अभिनेत्याने ट्रेनमधून प्रवास करणं बंद केलं, इतकी भीती त्याच्या मनात आहे.

‘हाउटरफ्लाई’ला दिलेलेल्या मुलाखतीमध्ये आमिर अली म्हणाला, “मी त्यावेळी खूप तरुण होतो. पहिल्यांदाच ट्रेनचा प्रवास करत होता. तेव्हा पहिल्यांदा कोणीतरी मला वाईट प्रकारे स्पर्श केला. त्यानंतर मी ट्रेनमधून प्रवास करणं बंद केलं. त्यावेळी मी १४ वर्षांचा होतो. पण, नंतर मी बॅग पार्श्वभागावर लावून आणि जास्त जोरात पकडायचो. जेणेकरून मला कोणाचा स्पर्श होऊ नये.”

‘यादरम्यान एकेदिवशी माझ्या बॅगेतून पुस्तक चोरी केलं गेलं. मला असं झालं, पुस्तक कोण चोरू शकतं? मग मी ट्रेनमधून प्रवास न करण्याचा निर्णय घेतला. पण, या घटनेनंतर मी खूप घाबरलो होतो. माझ्या मनात पुरुषांबद्दल शंका निर्माण होऊ लागल्या होत्या. तेही त्या पुरुषांबद्दल जे इतर पुरुषांकडे आकर्षित होतात, असं आमिर अलीने सांगितलं.

पुढे आमिर अली म्हणाला, “जसा मी मोठा होतो गेलो, तसं मला जाणवलं की, समलिंगी पुरुषांकडे अशा नजरेने बघायला नाही पाहिजे. मग, माझे काही मित्र होते. ज्यांनी मला उघडपणे सांगितलं की, त्यांना पुरुषांबद्दल भावना आहेत आणि मी त्यांना चांगला ओळखतो. तो माझ्या भावांसारखा आहे. मी त्यांच्याबरोबर एकाच बेडवर झोपू शकतो.”

दरम्यान, आमिर अलीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्यानं ‘वो रहने वाली महलों की’, ‘कहानी घर घर की’ आणि ‘क्या दिल में’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. याशिवाय तो ‘आय हेट लव्ह स्टोरीज’ आणि ‘फराज’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसला आहे. वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, आमिरनं २०१२ मध्ये संजीदा शेखशी लग्न केलं होतं. पण २०२१ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. दोघांना सहा वर्षांची मुलगी आहे, जिचं नाव आर्या आहे. काही दिवसांपूर्वी ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या मुलाखतीमध्ये आमिरनं सांगितलं होतं की, तो त्याच्या मुलीच्या संपर्कात नाही.