आषाढी एकादशीनिमित्त आज सर्वत्र उत्सवाचं वातावरण आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वारकरी विठू नामाचा गजर करत वारीत सहभागी झाले होते. अनेक कलाकारांनी देखील वारीत सहभागी होऊन वारीचा आनंद घेतला. आज अनेक कलाकार पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी गेले आहेत. यापैकीच एक म्हणजे अभिनेते आदेश बांदेकर.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आज आषाढी एकादशीनिमित्त कलाकार सोशल मीडियावर विविध फोटो शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा देत आहेत. तर काही कलाकार आज पंढरपूरला जाऊन विठ्ठल-रखुमाईचं दर्शन घेणार आहेत. अभिनेते आदेश बांदेकरही पंढरपूरला गेले असून त्यांनी आज विठ्ठल-रखुमाईचं दर्शन घेतलं. इतकंच नाही तर त्यांनी रखुमाईला पैठणी अर्पण केली.

आणखी वाचा : Video: स्वयंपाक केला, अनवाणी होऊन फुगडी खेळली आणि…; विठुरायाच्या नामात प्राजक्ता दंग

आदेश बांदेकर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावरून समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ते पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात विठ्ठल-रखुमाईचं दर्शन घेताना दिसत आहेत. दर्शनाच्या वेळी त्यांनी ऑफ व्हाईट रंगाचा झब्बा, पांढऱ्या रंगाची सलवार परिधान केली होती. तर डोक्यावर पांढरी टोपी आणि कपाळावर टिळा लावून ते मंदिरात गेले. आधी त्यांनी विठ्ठलाला तुळशीचा हार घातला, प्रसाद अर्पण केला. विठ्ठलाचं दर्शन घेऊन झाल्यावर त्यांनी रखुमाईचं दर्शन घेतलं. त्यांनी रखुमाईला फुलांचा हार आणि प्रसाद तर अर्पण केलाच पण त्याचबरोबर त्यांनी रखुमाईला सुंदर गुलाबी रंगाची पैठणीही अर्पण केली. तेथील गुरुजींनी लगेच ती पैठणी रखुमाईला नेसवली.

हेही वाचा : “दादा आले” म्हणताच भावोजींनी काढला होता पळ, जाणून घ्या सुचित्रा आणि आदेश बांदेकरांची हटके लव्हस्टोरी

विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनानंतर भावोजींना झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे या व्हिडीओत दिसत आहे. त्यांचा हा व्हिडीओ आता चांगलाच चर्चेत आला आहे. तर या व्हिडीओवर कमेंट करत त्यांचे चाहते विविध प्रतिक्रिया देत आनंद व्यक्त करत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor adesh bandekar goes to pandharpur to take blessings on the occasion of aadhadhi ekadashi rnv