मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार सध्या नवीन घरं आणि गाड्या खरेदी करत आहेत. मीरा जोशी, मानसी नाईक, प्रियदर्शनी इंदलकर या अभिनेत्रींपाठोपाठ आता ‘स्वाभिमान’ फेम अभिनेता अक्षर कोठारीने नवीन गाडी खरेदी केली आहे. अक्षर कोठारी हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. अभिनेत्याने त्याच्या नव्या गाडीची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे.
हेही वाचा : बेबी बंपचे मॉर्फ फोटो अन् गरोदरपणाच्या चर्चांवर अंकिता लोखंडेने सोडलं मौन; म्हणाली, “या लोकांना…”
अक्षर कोठारीने नवीन गाडी त्याच्या आई-वडिलांना भेट म्हणून दिली आहे. गाडी विकत घेतानाचा आणि गाडीची पूजा करतानाचा खास व्हिडीओ अक्षरने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. आई-वडिलांना गाडी गिफ्ट देत अक्षर लिहितो, “ज्यांनी मला घडवलं…त्यांच्यासाठी ही छोटीशी भेट! लव्ह यू मम्मी पप्पा.”
हेही वाचा : …म्हणून अशोक सराफ आजही मानतात दादा कोंडकेंचे आभार, जाणून घ्या कारण
अक्षरने या व्हिडीओला डेनिस वेटलीचा एक कोटा जोडला आहे. “सुखाच्या शोधात आपल्याला तृप्ती मिळतेच असे नाही, खरा आनंद हा शोधण्यातच असतो…” अभिनेत्याने या नव्या कोऱ्या गाडीची पूजा आईच्या हस्ते केली. त्यानंतर अक्षरने आई-बाबांना नव्या गाडीत बसवलं. लेकाने नवीन गाडी घेतल्यामुळे त्याचे आई-बाबा सुद्धा प्रचंड आनंदी असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
नवीन गाडी घेतल्याबद्दल नेटकऱ्यांनी अक्षर कोठारीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अपूर्वा नेमळेकर, ऋतुजा बागवे, सुकन्या मोने, मंदार जाधव, श्रुती मराठे, गिरिजा प्रभू, रेश्मा शिंदे या मराठी कलाकारांनी अक्षरचं कौतुक केलं आहे. दरम्यान, ‘कमला’, ‘छोटी मालकीण’, ‘स्वाभिमान’ अशा प्रसिद्ध मालिकांमध्ये अक्षरने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.