‘रंग माझा वेगळा’ मालिकेतून घराघरात पोहोचलेला आदित्य म्हणजेच अभिनेता अंबर गणपुळे सध्या चांगलाच चर्चेत आहे. कारण आहे त्याची नवी मालिका. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर नुकतीच अंबर गणपुळेची ‘दुर्गा’ ही मालिका नवी सुरू झाली आहे. या मालिकेतील अभिनेता प्रमुख भूमिकेत झळकला आहे. त्यामुळे अंबर सध्या विविध एंटरटेनमेंट युट्यूब चॅनलशी संवाद साधताना दिसत आहे. अशातच त्याने होणारी बायको अभिनेत्री शिवानी सोनार आयुष्यात आल्यामुळे कसा मोठा बदल झाला? याविषयी सांगितलं. नेमकं तो काय म्हणाला? वाचा…

‘दुर्गा’ मालिकेनिमित्ताने अभिनेता अंबर गणपुळेने नुकताच ‘राजश्री मराठी’ एंटरटेनमेंट युट्यूब चॅनलशी संवाद साधला. यावेळी त्याला विचारलं की, साखरपुडा झाल्यानंतर तुला मालिका मिळाली आहे. त्यात तू प्रमुख भूमिका करत आहे. तर हे लेडी लक म्हणायचं का? यावर अंबर म्हणाला, “हो, १०० टक्के लेडी लक आहे. शिवानी आल्यापासून माझ्या आयुष्यात गोष्टी बदलल्या आहेत. सकारात्मक दृष्टीकोनातून बदल झाला आहे. एक माणूस म्हणून हळूहळू बदल होत आहे.”

Shahid Kapoor Mira Rajput
“तू ‘जब वी मेट’मधील आदित्य सारखा नाही…”; पत्नी मिरा राजपुतची तक्रार, शाहिद कपूर म्हणाला, “आनंदी हो…”
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
chhaava movie lezim scene controversy marathi actress ruchira jadhav
“चित्रपट बघण्याआधीच निर्बुद्धपणे…”, ‘छावा’च्या वादावर मराठी अभिनेत्रीचं स्पष्ट मत; म्हणाली, “माझ्या राजाला…”
Fatima Sana Shaikh News
Fatima Sana Shaikh : फातिमा सना शेखने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव; “तो माणूस मला म्हणाला, तुला…”
Tejshree Pradhan
“जे हक्काचे…”, तेजश्री प्रधान ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यावर काय करतेय? म्हणाली, “आताच्या घडीला…”
Rakesh Roshan And Jitendra
“मी आणि जितेंद्र…”, बॉलीवूड दिग्दर्शक राकेश रोशन म्हणाले, “त्याने आम्हाला शिवीगाळ…”
man dhaga dhaga jodte nava fame actor abhishek rahalkar engagement
‘मन धागा धागा जोडते नवा’ फेम अभिनेत्याने गुपचूप उरकला साखरपुडा; ‘दुर्गा’ फेम अभिनेत्रीने शेअर केलेला फोटो चर्चेत
Mugdha Karnik
क्षिती जोगने हेमंत ढोमेशी लग्नाचा निर्णय घेतल्यावर ‘पारू’फेम अभिनेत्रीला सांगितलं अन्…, ‘अशी’ होती तिची प्रतिक्रिया

हेही वाचा – ‘दुर्गा’ मालिका मिळाल्यावर अंबर गणपुळेच्या होणाऱ्या पत्नीची होती ‘ही’ प्रतिक्रिया, शिवानी सोनार म्हणाली, “आता तू माझ्या…”

पुढे अंबर गणपुळे म्हणाला, “मी पूर्ण स्वतःच्या कोषात असायचो. आता तिने मला यातून बाहेर काढलं आहे. आमच्या स्वभावात खूप विरोधाभास आहे. पण ती वेळोवेळी मला पुश करत असते तू हे कर तू ते कर वगैरे. मी तसा प्रयत्नही करतो. त्यामुळे माझ्याबरोबर लेडी लक आहेच.”

हेही वाचा – Video: धनंजय पोवारच्या पत्नी व आईने ‘बिग बॉस’वर आरोप करत व्यक्त केली नाराजी, म्हणाल्या, “त्याला दाखवतंच नाहीये काय भानगड…”

वेळेअभावी सध्या तारेवरची कसरत आहे – अंबर गणपुळे

“आता आम्ही दोघं मुंबईत राहून ही आमचं लाँग डिस्टन्स सुरू आहे. त्यामुळे ती गोरेगावला, मी ठाण्याला असतो. चित्रीकरणाच्या वेळा मॅच होतं नाहीयेत, सुट्ट्या मॅच होतं नाहीयेत. त्यामुळे तारेवरची कसरत आहे. पण थोडा काळ ती करावी लागेल. त्याची तयारी आमची आहे. शेवटी काम महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी येतील,” असं अंबर म्हणाला.

Story img Loader