लोकप्रिय टीव्ही अभिनेता व गायक अमित टंडन (Amit Tandon) याने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. ‘इंडियन आयडल १’मधून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या अमितने ‘वो कैसा ये प्यार है’, ‘दिल मिल गए’, ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’, ‘ये हैं मोहब्बतें’ या मालिकांमध्ये काम केलंय. वैयक्तिक आयुष्यात पत्नीची अनेकवेळा फसवणूक केली आहे, अशी कबुली अमितने दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत अमितने स्वतःबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले. विवाहबाह्य संबंध ठेवले, जाणीवपूर्वक पत्नीची फसवणूक केली, असं अमित म्हणाला. अमितच्या पत्नीने २०१७ मध्ये त्याच्यापासून घटस्फोट घेतला होता. मात्र, घटस्फोटानंतर सहा वर्षांनी त्याने पुन्हा तिच्याशीच लग्न केलं. रुबी असं अमितच्या पत्नीचं नाव आहे.

हेही वाचा – ‘स्त्री २’ नव्हे तर ‘हा’ आहे २०२४ मध्ये सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट; जगभरात कमावले तब्बल…

पत्नीची खूप वेळा केली फसवणूक

अमित म्हणाला, “मी एकामागून एक मुलींना डेट करत होतो, पण कधीच सिरियस रिलेशनशिपमध्ये नव्हतो. माझ्यावर प्रेम करणाऱ्या अनेकांना मी दुखावलं आहे. मी लग्नानंतरही बदललो नाही आणि मी माझ्या पत्नीची अनेकदा फसवणूक केली. अनेकदा तर ठरवून फसवणूक केली.” अशी कबुली अमितने दिली. सुरुवातीला त्याच्या पत्नीला त्याच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल काहीही माहिती नव्हते, पण जेव्हा तिला समजलं तेव्हा तिला उद्ध्वस्त झाली, असं अमितने सांगितलं.

अमित टंडन व रुबी टंडन यांच्या लग्नातील फोटो

हेही वाचा – बॉलीवूड कलाकारांची फौज, तब्बल ३५० कोटींचे बजेट; मात्र चित्रपट ठरला सुपरफ्लॉप, कमावले फक्त…

१० वर्षांच्या संसारानंतर घेतला घटस्फोट

अमित टंडन व रुबी यांचं २०१७ मध्ये लग्न झालं. काही काळाने त्यांच्यात मतभेद व भांडणं होऊ लागली. दोघेही रागीट स्वभावाचे असल्याने भांडणानंतर आपापल्या खोल्यांमध्ये निघून जायचो. भांडण सोडवायचा कधीच प्रयत्न करायचो नाही, असं अमित म्हणाला. अमित फसवणूक करतोय हे समजल्यावर रुबीने २०१७ मध्ये घटस्फोट घेतला होता.

हेही वाचा – वडील सुपरस्टार, स्वतःही केले हिट चित्रपट; आता जग फिरतोय ‘हा’ अभिनेता, लोकांच्या शेतातही करतो काम

पहिल्या पत्नीशीच केलं पुन्हा लग्न

अमित घटस्फोटानंतर आयुष्यात पुढे गेला. नंतर त्याच्या अनेक गर्लफ्रेंडही राहिल्या. मात्र शेवटी तो त्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीजवळ परत आला. घटस्फोटानंतर सहा वर्षांनी अमितने २०२३ मध्ये पुन्हा रुबीशी लग्न केलं. दोघांनी नात्यातील कटू आठवणी विसरून नवी सुरुवात केली आहे. या जोडप्याला एक मुलगीदेखील आहे.