‘झी मराठी’वर ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रम काही दिवसांपूर्वी सुरू झाला. आतापर्यंत या कार्यक्रमांमध्ये अनेक राजकारणी, नेतेमंडळी यांनी पाहुणे म्हणून हजेरी लावली. आता या कार्यक्रमाच्या पुढील भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अभिनेते डॉ. अमोल कोल्हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात ते राजकारण आणि अभिनय क्षेत्र याबद्दल भरभरून बोलताना दिसणार आहेत. यावेळी त्यांनी ते भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांवरही भाष्य केलं.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे भाजपामध्ये प्रवेश करणार अशा चर्चांना उधाण आलं होतं. अमोल कोल्हे यांच्या एका भाषणातील काही क्लिप्स व्हायरल झाल्यामुळे ते भाजपात प्रवेश करणार अशा चर्चा रंगल्या होत्या. आता ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमात अवधूत गुप्तेने याबद्दल त्यांना प्रश्न विचारला. या प्रश्नाचं अमोल कोल्हे यांनी उत्तरही दिलं.

Amit Shah left public meeting after five minutes due to fear of helicopter couldnt fly after 6 pm
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणतात,’ मोदींनी नक्षलवाद व आतंकवाद संपविला’
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Dhananjay Munde
Dhananjay Munde : “पंकजाताईने मन मोठं केलं म्हणून…”, धनंजय मुंडेंचं परळीकरांसमोर वक्तव्य; म्हणाले, “मतदारसंघात लोकसभा निवडणुकीवेळी…”
Sharad Pawar on Gautam Adani meeting
Sharad Pawar: “होय, बैठक झाली होती, पण…”, NCP-BJP एकत्र येण्यासाठी अदाणींच्या घरी बैठक; अजित पवारांच्या दाव्यावर शरद पवार म्हणाले…
Sayed Azeempeer Khadri
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर इस्लाम स्वीकारण्यास तयार होते’, काँग्रेसच्या माजी आमदाराच्या विधानामुळं खळबळ
nitin gadkari
Nitin Gadkari: ‘भाजपाचं पिक वाढलंय, त्यावरही फवारणी करण्याची गरज’, नितीन गडकरींचा इशारा कुणाकडे?
Amit Shah IMP Statement about CM Post
Amit Shah : ‘महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण?’ अमित शाह म्हणाले, “नेतृत्व…”

आणखी वाचा : “राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व अजित पवारांकडे हवं की सुप्रिया सुळेंकडे?” अमोल कोल्हेंनी दिलं स्पष्ट उत्तर; म्हणाले…

या आगामी भागाची एक क्लिप खूप व्हायरल होत आहे. त्यात अवधूत गुप्ते अमोल कोल्हे यांना म्हणतो, “तुम्ही भाजपामध्ये जाणार यावर खूप जण पैज लावून आहेत. लहान मुलंही ठाम आहेत की आता कोल्हेंचा एक पाय भाजपामध्ये आहे. आज या व्यासपीठावर तुम्ही काय ते सांगून टाका.” त्यावर अमोल कोल्हे उत्तर देत म्हणतात, “मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळे उगाच नांगर खांद्यावर घेऊन चालत नाही. आधी आभाळ बघून मग जमीन कधी नांगरायची ते ठरवावं लागतं. हे राजकीय उत्तर आहे. पण, खरं उत्तर हे आहे की…”

हेही वाचा : डॉक्टरकीचं शिक्षण घेऊन अमोल कोल्हेंनी अभिनय क्षेत्रात करिअर करायचं का ठरवलं? खुलासा करत म्हणाले…

त्यामुळे आता अमोल कोल्हे यांचं पुढील उत्तर काय असणार हे ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमाच्या आगामी भागातच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. त्यामुळे आता या नवीन भागाबद्दल प्रेक्षकांच्या मनात खूप उत्सुकता निर्माण झाली आहे.