खासदार आणि अभिनेते डॉ.अमोल कोल्हे हे त्यांच्या अभिनयामुळे आणि राजकीय भूमिकांमुळे चर्चेत असतात. अभिनेता म्हणून आतापर्यंत त्यांनी अनेक मालिका, नाटक, चित्रपटांमधून वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आणि त्यांचं भरभरून कौतुकही झालं. राजकारणात आणि अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी अमोल कोल्हेंनी वैद्यकीय शिक्षणात पदवी घेतली आहे. नुकतंच एका कार्यक्रमामध्ये अमोल कोल्हे वैद्यकीय, अभिनय आणि राजकीय क्षेत्राबद्दल मनमोकळेपणाने बोलले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- “बऱ्याचदा मला तिचं म्हणणं पटत नाही, पण…”, आईच्या ‘त्या’ तक्रारीनंतर देवेंद्र फडणवीसांचे भावुक वक्तव्य

झी मराठी’वर काही दिवसांपूर्वी ‘ सुरू झालेल्या ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉ. अमोल कोल्हे उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी या कार्यक्रमात अनेक राजकारणी, नेतेमंडळी पाहुणे म्हणून हजेरी लावतात. आता अमोल कोल्हे या कार्यक्रमामध्ये राजकारण आणि अभिनय क्षेत्राबद्दल भरभरून बोलताना दिसणार आहेत.

कार्यक्रमात अवधूत गुप्तेनी अमोल कोल्हेंना त्यांच्या पत्नीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. “बायकोचा तुमच्यावर डॉक्टर म्हणून जास्त विश्वास आहे की राजकारणी म्हणून?” असा प्रश्न अमोल कोल्हे यांना विचारला. या प्रश्नाचं उत्तर देत अमोल कोल्हे म्हणाले, “खरं तर दोन्ही नाही. मुळात मेडिकलचा टच बऱ्यापैकी सुटलेला आहे. त्यामुळे डॉक्टर म्हणून असण्याचा काही विश्वास नाही. आणि दुसरं म्हणजे तुम्ही बाहेर कितीही चांगले वक्ते असला आणि कुठलाही जगातला वक्ता असला तरी तो घरात श्रोता असतो.”

हेही वाचा- “राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व अजित पवारांकडे हवं की सुप्रिया सुळेंकडे?” अमोल कोल्हेंनी दिलं स्पष्ट उत्तर; म्हणाले…

एमबीबीएसचं शिक्षण घेत असतानाच अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा विचार त्याच्या मनात आला होता. असे खूप कमी जण असतात ज्यांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात करिअर करायला मिळतं. आवड जोपासणारे अनेक असतात पण आवडीच्या क्षेत्रात करिअर करायला मिळतं तेव्हा तो सगळा सुखकर प्रवास सुरू होतो आणि एमबीबीएस करत असतानाच ही जाणीव मला प्रकर्षाने झाली की आपल्याला अभिनय क्षेत्रात जायचं आहे.” असं कोल्हे म्हणाले होते.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor amol kolhe talk about his medical acting and politics career in khupte tithe gupte dpj
Show comments