कलाविश्वातील मंडळींचं लग्न नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. आता अशाच एका अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. छोट्या पडद्यावरील ‘मामाजी’ म्हणजेच अभिनेता परितोष त्रिपाठी विवाहबंधनात अडकला आहे. उत्तराखंडमध्ये परितोष व मिनाक्षीचा विवाहसोहळा पार पडला. यादरम्यानचे बरेच फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
आणखी वाचा – लग्नानंतर नाशिकला पोहोचले राणादा-पाठकबाई, अक्षया देवधरच्या मंगळसूत्राच्या डिझाईनने वेधलं लक्ष
काही रिपोर्ट्सनुसार, उत्तराखंड येथील एका रिसॉर्टमध्ये परितोष व मिनाक्षीचा विवाहसोहळा पार पडला. परितोषच्या या विवाहसोहळ्याला काही कलाकार मंडळींनीही हजेरी लावली होती. पंकज त्रिपाठी, गीता कपूर, रवी दुबे, ऋत्विक धनजानी अशा अनेक मंडळींनी परितोषच्या लग्नसोहळ्याला उपस्थिती दर्शवली.
ऋत्विकने परितोषच्या लग्नाचे काही फोटोही सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत. लग्नासाठी परितोषने फिक्या पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली आहे. तर मिनाक्षीने डिझायनर लेहंगा परिधान केला आहे.
आणखी वाचा – “कथानकाची गरज असेल तर…” स्त्री वेश परिधान करण्याबाबत शरद पोंक्षेंचं स्पष्टीकरण, म्हणाले, “अन्यथा ते हिडीस…”
परितोषने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे हळदी कार्यक्रमाचे फोटोही शेअर केले आहेत. या फोटोमध्ये पंकज त्रिपाठीही दिसत आहे. ‘सुपर डान्सर’ या कार्यक्रमाचा सुत्रसंचालक म्हणून परितोष नावारुपाला आला. त्याने सुत्रसंचालक म्हणून साकारलेलं ‘मामाजी’ हे पात्र लोकप्रिय ठरलं. शिवाय ‘हंसी का तड़का’, ‘न बोले तुम न मैंने कुछ कहा’ सारख्या कार्यक्रमांमध्येही परितोषने काम केलं.