मनुस्मृती हा सध्याच्या घडीला चर्चेचा विषय ठरला आहे. जितेंद्र आव्हाडांनी केलेलं आंदोलन, मनुस्मृतीतले श्लोक अभ्यासक्रमात आणले जाणार असल्याची चर्चा यामुळे मनुस्मृती चर्चेत आहे. राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया येत आहेत. अशातच ठाकरे गटात गेलेले अभिनेते किरण माने यांनी मनुस्मृतीतील श्लोकांचा अर्थ सांगत या मनुस्मृतीतल्या एका श्लोकाचं कौतुक करणाऱ्या महिलेला प्रश्न विचारले आहेत.

मनुस्मृतीत स्त्रियांना दुय्यम स्थान

मनुस्मृतीत असे अनेक श्लोक आहेत, ज्यामध्ये महिलांना दुय्यम स्थान दिलं आहे असं किरण मानेंनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. एक श्लोक चांगला असला म्हणून भुलून जाऊ नका, व्हॉट्स अॅप विद्यापीठांना बळी पडू नका. मनुस्मृतीची शिकवण द्यायची की शिव-शाहू-फुले आंबेडकरी विचारांनी समृद्ध व्हायचं हे तुम्ही ठरवा असंही किरण मानेंनी म्हटलं आहे. त्यांची फेसबुक पोस्ट चर्चेत आहे.

Myra Vaikul Upcoming Movie Mukkam Post Devach Ghar review
छोट्यांची मोठी गोष्ट
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Cancer , positive thinking ,
प्रवास : असाध्यतेकडून साध्यतेकडे
Myra Vaikul
मायरा वायकूळ रडण्याचा सीन शूट करण्यासाठी काय करायची? म्हणाली, “मी एका जागेवर…”
Tejaswini Pandit
“माझ्या बालमित्राने मला…”, सुंदर साडीतील फोटोंमध्ये तेजस्विनी पंडितची खास पोस्ट; म्हणाली, “माझं न संपणारं प्रेम…”
kshitee jog
“एक झिम्मा चालला म्हणजे…”, क्षिती जोग ‘त्या’ चित्रपटाच्या अपयशावर काय म्हणाली?
karnataka man suicide
Karnataka Suicide: ‘पत्नीने छळ केला’ म्हणत पतीची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये लिहिलं,”तिला माझं मरण हवंय”!
basti novel loksatta
तळटीपा : ये कैसी सरहदें…

काय आहे किरण मानेंची फेसबुक पोस्ट?

‘मनुस्मृती’ लिहीनारं मनू भृगू का कोन बांडगुळ हाय ते लै अवलादी असणार यात शंका नाही… आजकाल एक नग हाय बघा…जो काल एक बोलतो आणि आज बरोब्बर त्याच्या विरूद्ध बोलतो… आन् उद्या तिसरंच कायतरी बरळतो ! तसंच ते मनुस्मृती लिहीनारं किरानीष्ट बोड्याचं बेनं असनारंय.

एका भगिनीने सांगितलेल्या श्लोकाचा संदर्भ

परवा एका भगिनीनं मनुस्मृतीतला एक श्लोक ऐकवला ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवता’ ! जिथं स्त्रियांची पूजा होते तिथं देवताही रमतात. ती पुढं म्हन्ली, “इतका मान स्त्रियांना दिलाय मनुस्मृतीत. तुम्ही जातीयवादी आहात म्हणून तुम्हाला कळत नाहीये.” व्हाॅटस् ॲप युनिव्हर्सिटीचा हा कचरा बघुन मी कपाळावर हात मारून घेतला.

तिला म्हटलं, “ताई, स्त्री आणि शुद्रांना अक्षरश: किड्यामुंगीपेक्षा बेकार वागणूक देणार्‍या मनुस्मृतीतल्या एका श्लोकावर इतकी खुश होऊ नकोस.” मग मी तिला लिस्टच दिली. मनुस्मृतीतला अध्याय दुसरा. श्लोक नंबर २१५. तिथं त्यानं लिहीलंय, “शृंगार, म्हणजेच नटणेमुरडणे करून पुरूषांना मोहित करणे हा स्त्रीस्वभाव आहे. माणूस सज्जन असो वा दुर्जन, त्याला वासनेच्या जाळ्यात अडकवण्यात स्त्रिया तयारीच्या असतात. त्यामुळे पुरूषाने तिला फार किंमत देऊ नये. स्वतःची आई-बहीण किंवा मुलीशीसुद्धा फार जवळ जाऊन अथवा एकांतात बसून बोलू नये !” दुसर्‍या अध्यायातल्याच २४६ व्या श्लोकात हा बाबा म्हणतो, “सुंदर स्त्री आपल्यापेक्षा हीन जातीतली असली तर तिला भोगण्यात कुठलेही पाप नाही. “

पाचव्या अध्यायाचा उल्लेख

पाचव्या अध्यायात तर त्यानं दांडगा धुमाकुळ घातलाय. मनूवाद्यांना साथ देणार्‍या प्रत्येक भगिनीनं ते वाचावं असं हाय. १४८ ते १५५ व्या श्लोकांमध्ये हा सांगतो, “बाईनं बालपणी पित्याच्या आज्ञेनं वागावं. तिनं कधीच स्वतःच्या मतानं वागू नये. पिता, पती, पुत्र यांच्या ताब्यात न रहाणारी, स्वतंत्र विचाराची स्त्री ही दोन्ही घराण्यांना कलंक असते. पतीनं कितीही छळ केला तरी पत्नीनं हसतमुखानं राहावे. आपल्या वडिलांनी ज्याच्याशी आपलं लग्न लावलंय तो कसाही असो… जिवंत असेपर्यंत बाईनं त्याचीच सेवा करावी. त्याच्या मरणानंतरही तिने दुसरा नवरा करू नये. नवरा व्यसनी, जुगारी, बाहेरख्याली असला… अडाणी असला… अपंग असला तरी तिने त्याला देवासामान मानावे ! पती निधनानंतर बाईने कमी जेवण करावे. शरीरसुखापासून अलिप्त रहावे. तरच तिला स्वर्ग मिळेल.”

हे पण वाचा- किरण मानेंचा मराठी कलाकारांना सवाल, “हंबरडे फोडणाऱ्या पोस्ट करणारी बांडगुळं..”

याहून खतरनाक घृणास्पद गोष्टींनी खचाखच भरलेला हा ग्रंथ आहे. उगाच नाही पुस्तकांवर जीव असनार्‍या डॉ. बाबासाहेबांनी तो ग्रंथ जाळला. एकजात सगळ्या हिंदू स्त्रियांना गुलाम ठरवणार्‍या या नीच – विषारी ग्रंथाचा कुणी कितीही उदोउदो करूद्या… त्याला भुलू नका. खोलात जाऊन अभ्यास केलात तर तुम्हाला कळंल की कुस्तीगीर महिलांचं शोषण करणार्‍या ब्रिजभूषणपासून ते तीन हजार महिलांवर बलात्कार करणार्‍या प्रज्वल रेवण्णापर्यन्त सगळे नराधम लोक मनुस्मृती मानणार्‍या जनावरांच्या नजरेत निर्दोष ठरतात. हे तुम्हाला मान्य आहे???

तुमच्या मुलांना मनुस्मृतीची शिकवण द्यायची की शिव-शाहू-फुले-आंबेडकरी विचारांनी त्यांना समृद्ध करायचे हे तुम्ही ठरवा. – किरण माने. अशी पोस्ट किरण मानेंनी केली आहे. जी चांगलीच चर्चेत आली आहे.

Story img Loader