गणेशोत्‍सव जवळ आला आहे, आपल्या लाडक्या बाप्पाचे दणक्यात आगमन होणार आहे. अनेक गणेशभक्‍तांप्रमाणे कलाकार देखील हा सण उत्‍साहात साजरा करण्‍यासाठी सज्ज आहेत. बाप्पाचा आगमनाचा उत्साह व्यक्त करताना ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेत ‘रघुनाथ’ ही भूमिका साकारणारे अशोक शिंदे यांनी गणेशोत्सवाच्या आठवणी जगावल्या आहेत.

आणखी वाचा : भूषण प्रधानच्या घरीच बनवली जाते गणपतीची मूर्ती, तर विसर्जन…; खुलासा करत अभिनेता म्हणाला…

Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Milind Gawali
“त्या मावशींनी मला शिव्यांची लाखोली…”, ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींनी सांगितला किस्सा
aishwarya rai and abhishek bachchan
“सेटवर आम्ही कधीच त्यांना…”, ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनबाबत अभिनेता म्हणाला, “त्यांच्या नात्यामुळे…”
Shruti Haasan With Parents
“लोक माझ्याकडे बोट दाखवायचे अन्…”, प्रसिद्ध अभिनेत्री घटस्फोटित आई-वडिलांना म्हणाली ‘हट्टी’
Marathi actress Vishakha Subhedar statement talking about divorce
“लग्नसंस्था आता आपण समाजानेचं मोडीत काढल्यात…”, घटस्फोटाबाबत बोलताना विशाखा सुभेदारचं वक्तव्य, म्हणाली…
Anshula Kapoor talks about parents Boney Kapoor Mona Kapoor divorce
“माझे आई-वडील वेगळे झाल्यावर…”, पालकांच्या घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच बोलली जान्हवी कपूरची सावत्र बहीण

ते म्हणाले, “माझ्या यशस्वी करिअर मध्ये बाप्पाचा खूप मोठा वाटा आहे ह्याच कारण म्हणजे मी पाचवीत असतांना मी पुण्याच्या दगडूशेठ गणपती चित्रकलेच्या स्पर्धा असायच्या आणि मी नेहमी त्या स्पर्धेत भाग घ्यायचो सलया स्पर्धेत सलग तीन वर्ष मी पहिला नंबर पटकावलेला आहे. माझे वडील उत्कृष्ट मेकअप आर्टिस्ट होते आणि त्यांची कला माझ्या हातात उतरली. मी जेव्हा १० वर्षांचा झालो तेव्हा रस्त्यावरून जाताना एक दुकानात बाप्पा बघत होतो आणि तेव्हा मला अचानक एक प्रश्न पडला बाप्पा कसा बनवतात बरं ,मी नाही का बनवू शकत? त्या नंतर मला एक कल्पना सुचली आणि मी थोडी शाडू माती विकत घेतली आणि कोणालाही न सांगता मी शाडू मातीचा छोटा गणपती बनवला. मी घाबरून आई बाबांना मूर्ती दाखवली, आधी त्यांचा विश्वासच बसला नाही पण नंतर त्यांना खूप आनंद झाला. आईने उत्साहात येऊन सांगितले की मूर्तीला रंग दे. आपण घरी याच गणपतीची स्थापना करूयात. तेव्हा आम्ही गणपतीची स्थापना करून मनोभावे पूजा केली व सालंकृत पद्धतीने सगळ्या गोष्टी केल्या.”

हेही वाचा : ‘असा’ असतो कविता मेढेकरांच्या घरचा गणेशोत्सव, म्हणाल्या, “सासूबाईंच्या निधनानंतर सासऱ्यांनी विचारलं की…”

पुढे ते म्हणाले, “त्या वेळेपासून आतापर्यंत ४८ वर्ष झाली आम्ही गणपतीची स्थापना करतो व पारंपरिक पद्धतीने त्याची पूजा करतो. आमच्या घरी पंच पक्वांनांचा प्रसाद करतो. मी आणि माझे कुटुंब सर्व प्रकारे बाप्पाची सेवा करतो. बाप्पाच्या कृपेने मला आजपर्यंत खूप प्रोजेक्ट्स मिळत गेले आणि मला नेहमी कामात व्यस्त ठेवले. माझी झी मराठीवर सुरु असलेली ‘सारं काही तिच्यासाठी’ ह्या मालिकेला देखील बाप्पाचा आशीर्वादाने खूप छान रिस्पॉन्स मिळतोय. ह्या वर्षीही बाप्पाचे तेवढ्याच उत्साहाने आगमन होईल आणि आम्ही नेहमी प्रमाणे त्याची सेवा करू. सगळ्या रसिकप्रेक्षकांना माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबियांकडून गणेश चतुर्थीच्या मनोमन हार्दिक शुभेच्छा !”