अविनाश नारकर हे मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. गेली अनेक वर्षं ते विविध मालिका, नाटकं, चित्रपट यांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यांच्या कामाबरोबर असते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. विशेष करून त्यांच्या पोस्ट आणि हटके डान्स रील्स कायम लक्ष वेधून घेत असतात. परंतु आता नुकतीच त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया पार पडली आहे आणि त्याची माहिती त्यांनी सोशल मीडियावरून दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अविनाश नारकर यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. तेही सोशल मीडियावर सक्रिय राहून त्यांच्या कामाबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी चाहत्यांची शेअर करत त्यांच्या संपर्कात असतात. आता अविनाश नारकर यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर केली. यामध्ये त्यांनी त्यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया झाली असल्याचं म्हटलं.

आणखी वाचा : “आम्ही उद्धव साहेबांबरोबरच आहोत कारण…”, सुचित्रा बांदेकरांनी मांडलं स्पष्ट मत

काल त्यांनी एक फोटो शेअर केला. हा फोटो हॉस्पिटलमधील आहे. यामध्ये ते, त्यांच्या पत्नी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि डॉक्टर तात्याराव लहाने दिसत आहेत. तर त्यांच्या मागे भिंतीवर विठ्ठलाचा फोटो दिसत आहे. ही पोस्ट शेअर करत त्यांनी लिहिलं, “जय हरी विठ्ठल || आज आषाढी एकादशीच्या दिवशी या पांडुरंगाच्या हस्तस्पर्षाने माझ्या दृष्टीची स्पष्टता वाढली…!! विठ्ठल विठ्ठल || जय हरी विठ्ठल.”

हेही वाचा : “मी पहिल्यांदा शॉर्ट्स घातली आणि…” ऐश्वर्या नारकर यांनी रंगलेल्या चर्चंबाबत केलं भाष्य

त्यांची ही पोस्ट आता खूप चर्चेत आली असून त्यावर कमेंट करत त्यांचे चाहते त्यांना काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत आणि त्याचबरोबर त्यांचं आरोग्य निरोगी राहावं यासाठी शुभेच्छा देत आहेत.