आलिया भट्ट, बिपाशा बासू, सोनम कपूर यांसारख्या अभिनेत्रींच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं. बऱ्याच कलाकारांसाठी यंदाचं वर्ष खासगी आयुष्यात लकी ठरलं. आता आणखी एका अभिनेत्याने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. अभिनेता अयाज खानही बाबा झाला आहे. त्याने खास फोटो शेअर करत ही बातमी चाहत्यांना दिली.
आणखी वाचा – कधीकाळी एअर होस्टेस म्हणून नोकरी करायची ‘ही’ सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, आता करते मालिकांमध्ये काम
अयाजच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं आहे. त्याने लेकीचा फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला. तसेच त्याने आपल्या मुलीचं नाव काय ठेवलं आहे हेही पोस्टद्वारे सांगितलं. अयाज सध्या कलाक्षेत्रापासून लांब जरी असला तरी त्याचा चाहतावर्ग मोठा आहे. त्याने ही आनंदाची बातमी शेअर करताच त्याच्यावर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
दुआ असं अयाजने त्याच्या मुलीचं नाव ठेवलं आहे. तो लेकीचा फोटो शेअर करत म्हणाला, “प्रार्थना पूर्ण होतात. देवाने आम्हाला आमची मुलगी दिली दुआ हुसैन खान.” अयाजने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याच्या मुलीचा चेहरा लपवण्यात आला आहे.
आणखी वाचा – Video : “बाबा तू ये ना” वडिलांना पाहून चिमुकल्याच्या भावना अनावर, आरोह वेलणकरच्या लेकाने सगळ्यांनाच रडवलं
अयाजने त्याच्या लेकीचा हात पडकलेला या फोटोमध्ये दिसत आहे. त्याची लेक गोंडस असल्याचं फोटोमध्येच दिसून येत आहे. २०१८मध्ये अयाजने जन्नत खानशी लग्न केलं. अयाजची जवळची मैत्रिण बिपाशा बासूनेही त्याच्या लेकीचा फोटो पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत. “देवी दुआला पाहण्यासाठी आतुर आहे.” असं बिपाशाने म्हटलं आहे. बिपाशाने तिच्या लेकीचं नाव देवी असं ठेवलं आहे.