‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक आहे. गेली अनेक वर्षे हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहे. या लोकप्रिय कार्यक्रमात अनेक बॉलीवूड सेलेब्रिटी, मराठी चित्रपट, नाटक क्षेत्रांसह राजकारणातील दिग्गज मंडळी येत असतात. तर आता ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात बच्चे कंपनीची धमाल पाहायला मिळणार आहे. त्यात भारत गणेशपुरे यांचा नातूही दिसणार आहे.

‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाच्या पहिल्या भागापासून अभिनेते भारत गणेशपुरे या कार्यक्रमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आले आहेत. या कार्यक्रमाने त्यांना नवी ओळख दिली. आज त्यांचा चाहतावर्गही प्रचंड आहे. या कार्यक्रमांमध्ये त्यांनी साकारलेले प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून गेले आहे. आता त्यांचा नातू या कार्यक्रमातून छोट्या पडद्यावर पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे.

During the speech of Devendra Fadnavis the chairs started emptying nashik news
देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणावेळी खुर्च्या रिकाम्या होण्यास सुरुवात
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Shiva
Video: आशू आणि शिवाच्या आयुष्यात दिव्यामुळे नवीन विघ्न? प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केली विनंती, म्हणाले, “कृपया आता काही…”
naga chaitianya sibhita dhulipala wedding card viral
नागा चैतन्य आणि सोभिता धुलिपालाची दाक्षिणात्य ढंगातील लग्नपत्रिका झाली व्हायरल, ‘या’ तारखेला होणार विवाहसोहळा
Govt Issues New Rules To Stop Misleading Ads By Coaching classes
विश्लेषण : शिकवणी वर्गांच्या जाहिरातींना चाप?
14th November Daily Astrology in Marathi
१४ नोव्हेंबर पंचांग: वैकुंठ चतुर्दशीला मेष ते मीनपैकी कोणाच्या डोक्यावर असेल श्रीहरी व महादेवाचे कृपाछत्र; वाचा तुमचे राशिभविष्य
massive protest by uppsc aspirants over exam dates
उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन

आणखी वाचा : Video: नाचता नाचता स्टेजवरून खाली पडला कुशल बद्रिके, ‘चला हवा येऊ द्या’मधील व्हिडीओ व्हायरल

अयांश कपिले असे त्यांच्या नातवाचे नाव आहे. अयांश त्यांच्या भाचीचा मुलगा आहे. नुकतीच अयांशने ‘चला हवा येऊ द्या’च्या शूटिंगला सुरुवात केली. तो साडेचार वर्षांचा आहे. “माझी आत्या माझ्या बहिणीच्या लग्नात अमरावतीला आली होती तेव्हा तिने अयांशला पाहिले. तिने अयांशची मस्ती, त्याचे बोलणे, त्याचा डान्स पाहिला आणि तिला अयांशमध्ये टॅलेंट दिसले. माझे मामा भारत गणेशपुरेही ‘चला हवा येऊ द्या’मध्ये काम करीत आहेत. अशी अयांशची अभिनयाची सुरुवात झाली,” असे अयांशच्या आईने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. तर “मुंबईमध्ये राहायला आणि शूटिंग करायला खूप मजा येते,” असे अयांशने या मुलाखतीत सांगितले.

हेही वाचा : “अशोक मामांनंतर तूच…”; कुशल बद्रिकेला मिळाली लाखमोलाची प्रतिक्रिया, उत्तर देत अभिनेता म्हणाला…

‘चला हवा येऊ द्या- लहान तोंडी मोठा घास’ हे नवीन पर्व १५ मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर या पर्वामध्ये लोकप्रिय बालकलाकार मायरा वायकुळही सहभागी होणार आहे. त्यामुळे लहान मुलांची ही धमाल बघणे म्हणजे प्रेक्षकांसाठी मेजवानीच असेल