लोकप्रिय तेलुगू व कन्नड अभिनेत्री पवित्रा जयरामचे रविवारी (१२ मे रोजी) कार अपघातात निधन झाले. पवित्राच्या निधनाचा धक्का बसल्याने तेलुगू अभिनेत्याने आत्महत्या केली आहे. तो त्याच्या राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. मुख्य म्हणजे पवित्राचा अपघात झाला त्यावेळी कारमध्ये तोही होता, पण त्याला किरकोळ जखमा झाल्या होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हैदराबादजवळ पवित्राच्या कारला बसने धडक दिली होती. या घटनेच तिचा जागीच मृत्यू झाला होता. तर तिची बहीण अपेक्षा, ड्रायव्हर श्रीकांत आणि अभिनेता चंद्रकांत हे जखमी झाले होते. चंद्रकांत हा लोकप्रिय तेलुगू अभिनेता होता. तो रंगारेड्डी जिल्ह्यातील अलकापूर येथील त्याच्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळून आला. त्याची ‘त्रिनयणी’तील सहकलाकार पवित्रा जयरामचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर काही दिवसांनीच ही घटना घडली आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री अपघातात जागीच ठार, दुभाजकावर आदळलेल्या कारला बसने दिली धडक, तिघे जखमी

वृत्तानुसार अभिनेता चंद्रकांत हा त्याच्या अलकापूर येथील राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. याच घरात चंद्रकांत व दिवंगत अभिनेत्री पवित्रा जयराम एकत्र राहत होते. पवित्राचा अपघात झाला त्यावेळी चंद्रकांत त्याच कारमध्ये होता. अभिनेत्रीच्या निधनाने त्याला मोठा धक्का बसला होता. चंद्रकांतने तीन दिवसांपूर्वी पवित्राबरोबरच्या फोटोंचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. “दोन दिवस वाट पाहा प्लीज” असं कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिलं होतं.

ऐश्वर्या राय बच्चनचे Cannes मधील २२ वे वर्ष; हाताला प्लास्टर अन् लेक आराध्याची साथ, पाहा खास Photos

चंद्रकांत व पवित्रा रिलेशनशिपमध्ये होते. चंद्रकांतने एका मुलाखतीत म्हटलं होतं की ते दोघेही लवकरच त्यांचं नातं अधिकृत करण्याचा विचार करत आहेत, पण दुर्दैवाने एकापाठोपाठ दोघांनी जगाचा निरोप घेतला.

पवित्रा जयरामचा अपघात

हैदराबादमधील मेहबूब नगरजवळ पवित्राचा अपघात झाला होता. पवित्रा कर्नाटकमधील मंड्या जिल्ह्यातील हणाकेरे इथं परतत असताना हा भीषण अपघात झाला होता. आयएएनएसच्या वृत्तानुसार, अभिनेत्रीच्या कारच्या ड्रायव्हरचं नियंत्रण सुटलं आणि कार दुभाजकाला धडकली. त्यानंतर एका बसने या कारला धडक दिली. या भीषण अपघातात पवित्राचा जागीच मृत्यू झाला तर तिच्याबरोबर असलेले इतर सर्वजण गंभीर जखमी. त्या सर्वांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

पवित्राच्या निधनानंतर चंद्रकांत तिच्याबरोबरचे फोटो व व्हिडीओ पोस्ट करत होता. त्याला पवित्राच्या निधनाचा धक्का बसला होता, पण तो आत्महत्येसारखं धक्कादायक पाऊल उचलेल असं कुणाला वाटलं नव्हतं. त्याचे चाहते त्याच्या पोस्टवर कमेंट्स करून त्याला श्रद्धांजली वाहत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor chandrakanth dies by suicide after actress pavitra jayaram death in road accident hrc
Show comments