टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेता गुरमीत चौधरीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तेव्हापासून त्याने एका कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. अचानक बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी अभिनेता गुरमीत चौधरीने पुढाकार घेतला आणि त्याला सीपीआर दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“…अन् माझे कारवरील नियंत्रण सुटले”, गायत्री जोशीचा अपघात पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शीने सांगितला धक्कादायक अनुभव

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये गुरमीत अचानक रस्त्याच्या कडेला पडलेल्या व्यक्तीला सीपीआर देताना दिसत आहे. आजूबाजूला सगळी गर्दी जमली होती आणि सगळे गुरमीतकडे बघत होते. अॅम्बुलन्सची वाट न पाहता, तसेच इतर कुणीतरी मदत करेल असा विचार न करता त्याने पुढाकार घेत भर रस्त्यात त्याने त्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी सीपीआर दिला.

मुंबईतील अंधेरी भागात ही घटना घडली. सीपीआर देताना गुरमीत इतरांना त्या व्यक्तीच्या पायाचे तळवे घासायला सांगतो. नंतर रस्त्यावर पडलेल्या ती व्यक्ती शुद्धीवर येते. त्यानंतर गुरमीत आणि इतर काही जण त्याला बसण्यास मदत करतात. उपस्थित सर्वजण अभिनेत्याचं कौतुक करताना दिसत आहेत.

‘वूम्पला’चा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर नेटकरी त्याचं कौतुक करत आहेत. ‘गुरमीतसाठी आदर वाढला आहे’. ‘त्याने त्या व्यक्तीला वाचविण्यासाठी प्रयत्न केले हे खूप कौतुकास्पद आहे’, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. काहींनी सीपीआर देण्याची ही पद्धत योग्य नसल्याचं म्हटलंय, पण गुरमीतच्या प्रयत्नांचं आणि मदतीचं कौतुक केलं आहे.