‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत एकेकाळी रोशनसिंग सोढी ही भूमिका साकारणारा अभिनेता गुरुचरण सिंग सात दिवसांपासून बेपत्ता झाला आहे. २२ एप्रिलला तो घरातून दिल्ली विमानतळावर जाण्यासाठी बाहेर पडला होता. पण तो मुंबईला पोहोचला नाही अन् घरीही परतला नाही. गुरुचरणच्या वडिलांनी दिल्लीतील पालम पोलिसांत तो बेपत्ता झाल्याची तक्रार दिली असून पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत.
अभिनेता बेपत्ता झाल्याची माहिती २६ एप्रिलला समोर आली होती. त्याचे वडील हरगीत सिंग यांनी मुलगा २२ एप्रिलपासून बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. गुरुचरण मुंबईला जाणार होता, त्याची २२ एप्रिलला रात्री साडेआठ वाजताची फ्लाइट होती, पण तो विमानतळावर गेलाच नाही. तो दिल्लीतील पालमसह इतर भागात पाठीवर बॅग घेऊन चालत फिरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला आहे. याचबरोबर त्याने दिल्लीत एका एटीएममधून सात हजार रुपये काढले होते.
गुरुचरण आर्थिक अडचणीत?
‘आज तक’च्या वृत्तानुसार, पोलिसांनी गुरुचरणच्या मोबाईल डिटेल्स तपासल्यानंतर अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुचरण २४ एप्रिलपर्यंत दिल्लीतच होता, यानंतर त्याचा मोबाईल बंद झाला. २४ तारखेला तो पालम येथील त्याच्या घरापासून फक्त दोन ते तीन किलोमीटर अंतरावर होता. तपासादरम्यान गुरुचरणचे लग्न होणार असल्याचेही समोर आले आहे. तसेच तो आर्थिक अडचणीतही होता. अशातच तो अचानक गायब झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
गुरुचरण सिंगची आई खूप आजारी असल्याने रुग्णालयात दाखल होती. अभिनेत्याने तारक मेहता हा शो वडिलांच्या आजारपणाचं कारण देत सोडला होता. ५० वर्षीय अभिनेत्याचे आई-वडील खूप वृद्ध आहेत, त्यामुळे त्यांची काळजी घ्यावी लागते. अभिनेता बेपत्ता होण्यापूर्वीची त्याची शेवटची पोस्ट ही त्याच्या वडिलांच्या वाढदिवसाची आहे. सात दिवसांपासून बेपत्ता झालेला गुरुचरण सुखरूप परत यावा, यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.