अभिनेता गुरुचरण सिंग बेपत्ता होऊन जवळपास २० दिवस उलटले आहेत. दिल्ली पोलीस अभिनेत्याचा शोध घेत आहेत. तपासात गुरुचरण १० हून जास्त बँक खाती वापरत होता, २७ ईमेल व दोन फोन वापरत होता, अशी माहिती समोर आली आहे. त्याची आर्थिक परिस्थिती फार चांगली नव्हती, तो क्रेडिट कार्ड वापरायचा, एका क्रेडिट कार्डमधील पैशांनी दुसऱ्या क्रेडिट कार्डची थकबाकी भरायचा अशी माहिती पोलिसांनी नुकतीच दिली आहे. मुलाच्या आर्थिक परिस्थितीबाबत त्याचे वडील हरगीत सिंग यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

गुरुचरण सिंगचे वडील हरगीत सिंग दिल्लीत राहतात. ‘बॉम्बे टाईम्स’ने त्यांना बेपत्ता गुरुचरण सिंग व त्याच्या आर्थिक परिस्थितीबद्दल माहिती विचारली. गुरुचरणच्या आर्थिक परिस्थितीबद्दल तुम्हाला माहिती आहे का, असं विचारलं असता ते म्हणाले, “माझ्या मुलाच्या आर्थिक परिस्थितीबद्दल मला काहीच माहिती नाही. त्याने मला याबद्दल कधीच काहीही सांगितलं नाही. त्यामुळे मला या सर्व गोष्टींची माहिती नाही. पोलिसांना त्यासंदर्भात काही कळालं असेल तर ते मला कळवतील, अशी मला खात्री आहे.”

१० हून जास्त बँक खाती, क्रेडिट कार्डचा ‘असा’ वापर अन्…; बेपत्ता गुरुचरण सिंगबद्दल नवीन माहिती आली समोर

गुरुचरणचे वडील वयोवृद्ध आहेत. वृद्धापकाळामुळे प्रकृती बरी राहत नाही, असंही हरगीत सिंग म्हणाले, “माझं वय झालं आहे, त्यामुळे माझी प्रकृती बरी राहत नाही. माझा मुलगा बेपत्ता होऊन बरेच दिवस झाले आहेत आणि या प्रकरणात अजून काहीच सकारात्मक माहिती मिळालेली नाही. आम्ही फक्त गुरुचरणच्या परत येण्याची वाट पाहत आहोत.”

२७ ईमेल वापरत होता गुरुचरण सिंग, बेपत्ता होण्यापूर्वी कोणाला केला शेवटचा होता फोन? पोलिसांनी दिली मोठी माहिती

काही दिवसांपूर्वी गुरुचरणच्या वडिलांनी मुलगा सापडत नसल्याने चिंता व्यक्त केली होती. “जे घडलंय ते खूप धक्कादायक आहे. ही परिस्थिती कशी हाताळावी, हे आम्हाला कळत नाहीये. आम्ही सगळे खूप चिंतेत आहोत आणि पोलिसांकडून गुरुचरणची काही अपडेट मिळेल, याची वाट पाहत आहोत. आम्ही त्याच्या परत येण्याची वाट पाहत आहोत,” असं हरगीत सिंग म्हणाले होते.

“मी चांगली बहीण होऊ शकले नाही,” रत्ना पाठक यांची कबुली; सुप्रियांचा उल्लेख करत म्हणाल्या, “मानसिक त्रास…”

गुरुचरण सिंग ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत रोशन सिंग सोढी ही भूमिका साकारून खूप लोकप्रिय झाला. अनेक वर्षे त्याने या मालिकेत काम केलं होतं. २००८ मध्ये सुरू झालेल्या या मालिकेत त्याने २०१३ पर्यंत काम केलं होतं, मग वर्षभराचा ब्रेक घेतला आणि २०१४ मध्ये तो मालिकेत परतला होता. त्यानंतर जवळपास सहा वर्षे त्याने पुन्हा मालिकेत काम केलं मग त्याने आई-वडिलांच्या प्रकृतीचं कारण देत २०२० मध्ये ही मालिका सोडली. तेव्हापासून तो स्क्रीनपासून दूर होता. तो दिल्लीतील पालम भागात त्याच्या आई-वडिलांबरोबर राहत होता.