‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम अभिनेता गुरुचरण सिंग २२ एप्रिलपासून बेपत्ता होता. २६ एप्रिलला अभिनेत्याच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली होती, तेव्हापासून त्याचा शोध सुरू होता, आता अखेर हा शोध संपला आहे. कारण गुरुचरण सिंग घरी परतला आहे. तो शुक्रवारी (१७ मे रोजी) घरी परत आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

गुरुचरण सिंग २२ एप्रिलला मुंबईला जाणार होता. तो घरातून दिल्ली विमानतळावर जाण्यासाठी निघाला, पण तो पोहोचलाच नाही. गुरुचरणची मैत्रीण भक्ती सोनी त्याला मुंबई विमानतळावर घ्यायला गेली होती, पण तो आलाच नसल्याचं कळालं. त्यानंतर त्या सर्वांनी आधी अभिनेत्याचा शोध घेतला, पण काहीच माहिती मिळू शकली नाही. नंतर गुरुचरणचे वडील मदतीसाठी पोलिसांकडे गेले. पोलीसही मागच्या २२ दिवसांपासून अनेक राज्यांमध्ये त्याचा शोध घेत होते, पण गुरुचरण शुक्रवारी स्वतःच घरी आला आहे.

ravi rana supporter maha kumbh tour
भाविकांना महाकुंभला नेले अन् पळ काढला; रवी राणांच्या कार्यकर्त्याचा प्रताप
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Vakrangee Technology, Dinesh Nandwana Death ,
मुंबई : ईडीची निवासस्थानी शोधमोहीम सुरू असताना व्यावसायिकाचा मृत्यू
Former corporator protest , Chandrapur ,
चंद्रपूर : माजी नगरसेवकाचा खड्ड्यात बसून सत्याग्रह
Ravindr Dhangkar on Shiv sena :
Ravindr Dhangkar : माजी आमदार रविंद्र धंगेकर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार? स्पष्टीकरण देत म्हणाले, “मी काँग्रेस पक्षात…”
mhada Eknath Shinde Pune Mandal Lottery for 3662 houses
म्हाडाच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांना हक्काचा निवारा, एकनाथ शिंदे पुणे मंडळाच्या ३६६२ घरांसाठी सोडत पार
Vasai bhrosa cell , bhrosa cell , police ,
वसई : पोलिसांच्या भरोसा कक्षाने सावरले १ हजार संसार
saif ali khan reached home after attack
सैफ अली खान रुग्णालयातून पाच दिवसांनी परतला घरी, हल्ला झाल्यानंतरचा अभिनेत्याचा पहिला व्हिडीओ आला समोर

Video: नुपूर शिखरेचं आईसह ट्रेंडिंग गाण्यावर जबरदस्त रील; पत्नी आयरा खानची खास कमेंट, तर सुश्मिता सेनला हसू आवरेना

कुठे होता गुरुचरण सिंग?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घर व आई -वडिलांना सोडून तो धार्मिक प्रवासावर गेला होता, असं गुरुचरण सिंगने चौकशीदरम्यान अधिकाऱ्यांना सांगितलं. जवळपास २५ दिवसांत तो अमृतसर आणि लुधियाना सारख्या अनेक शहरांतील गुरुद्वारांमध्ये थांबला होता, पण नंतर आपण घरी जायला पाहिजे याची त्याला जाणीव झाली आणि तो घरी परतला, असं पोलिसांनी सांगितलं. यासंदर्भात ‘इंडिया टुडे’ने वृत्त दिलं आहे.

“माझी आई बाबांच्या दुसऱ्या लग्नाला गेली होती,” अभिनेत्री अलायाचा गौप्यस्फोट; म्हणाली, “माझा सावत्र भाऊ…”

पोलिसांनी मुंबईत तारक मेहता..च्या सेटला दिली होती भेट

बेपत्ता गुरुचरणला शोधण्यासाठी दिल्ली पोलीस मुंबईत ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेच्या सेटवर गेले होते. “ते मालिकेच्या सेटवर आले होते. ते माझ्याशी गुरुचरणबद्दल बोलले आणि मी त्यांना सांगितलं की तीन महिन्यांपूर्वी एका मॉलमध्ये आमची भेट झाली होती. आम्ही त्या दिवशी थोडं बोललो होतो आणि नंतर एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. अधिकाऱ्यांना गुरुचरणच्या सह-कलाकारांशी बोलायचं होतं,” असं मालिकेचे प्रोजेक्ट हेड सोहेल रमाणी यांनी सांगितलं होतं.

दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या पथकांनी दिल्ली आणि मुंबईतील ५० हून अधिक लोकांचे जबाब घेतले होते. याव्यतिरिक्त, त्यांनी अभिनेत्याचा शोध घेण्यासाठी हरियाणा, पंजाब आणि उत्तराखंड या राज्यातही तपास केला होता. पण अभिनेता पंजाबमध्ये होता आणि तिथून स्वतःच घरी परतला आहे.

Story img Loader