छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून अभिनेता हार्दिक जोशी घराघरात पोहोचला. याच मालिकेने त्याला प्रसिद्धी मिळवून दिली. मालिकेत राणादा या त्याने साकारलेल्या पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. आता हार्दिक मोठ्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘हर हर महादेव’ या ऐतिहासिक चित्रपटात हार्दिक महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनकरिता त्याने नुकतंच झी वाहिनीवरील ‘बस बाई बस’ कार्यक्रमात हजेरी लावली. सुबोध भावे या शोचं सूत्रसंचालन करत आहे. हार्दिकने या शोमध्ये अनेक गमतीदार किस्से सांगितले. यावेळी त्याने ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेच्या आठवणीही सांगितल्या. सुबोधने त्याला “पैलवान असण्याचे काही तोटे आहेत का?”, असं विचारलं.

हेही वाचा >> “बॉलिवूडच्या बादशहाने माझा हात हातात घेतला अन्…”, सायली संजीवने सांगितला शाहरुख खान भेटीचा किस्सा

सुबोधच्या या प्रश्नाला उत्तर देत हार्दिक म्हणाला, “नाही. पैलवान असण्याचे कोणतेही तोटे नाहीत. पण आमचा आहार फार मोठा असतो. ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिका सुरू होती तेव्हाही माझा आहार दणकट असायचा. मी दिवसाला २५ अंडी, एक लिटर दूध किंवा एक किलो चिकन, मटण खायचो. आणि सलग पाच वर्ष मी असा आहार घेतला आहे. त्यामुळे जेवताना माझ्या बाजूला कोणीही बसायचं नाही. मालिकेसाठी मी २५ दिवसांत २३ किलो वजन वाढवलं होतं”.

हेही वाचा >> रस्त्यावरील छोट्या मुलीला पैसे दिल्यानंतर दुसरा मुलगाही काजोलच्या गाडीमागे धावला अन्…; पाहा व्हिडीओ

हेही पाहा >> Photos : विजय देवरकोंडाचा फोटो पाहताच सायली संजीव लाजली, म्हणाली “माझं तुझ्यावर…”

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेमुळे हार्दिकला त्याची जोडीदारही मिळाली. अभिनेत्री अक्षया देवधरने मालिकेत पाठक बाईंची भूमिका साकारली होती. राणादा-पाठक बाई या जोडीचं प्रेक्षकांच्या मनातील स्थान आजही कायम आहे. अक्षया आणि हार्दिक लवकरच विवाहबंधनात अडकून त्यांच्या नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor hardeek joshi recollect tuzyat jeev rangla serial memories said he eat 25 eggs day for five years kak
Show comments