छोट्या पडद्यावरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या मालिकेतील शुभम-किर्ती या जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. अगदी साधा स्वभाव असणाऱ्या व निर्मळ मनाच्या शुभम या व्यक्तिरेखेवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करायचे. या मालिकेचा शेवटचा भाग रविवारी (४ डिसेंबर) प्रसारित झाला आणि या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत शुभम ही व्यक्तिरेखा अभिनेता हर्षद अटकरी साकारत होता. मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेताच हर्षदने त्यांच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन भावूक पोस्ट शेअर केली आहे. हर्षदने सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोला दिलेल्या कॅप्शनने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा>> आमिर खानच्या मुलीनंतर बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या लेकीने गुपचूप उरकला साखरपुडा, फोटो व्हायरल

“जरा ऐकता का…रसिक मायबाप, निरोप घेतोय…’फुलाला सुगंध मातीचा’ आणि शुभम चा ७३० भागांचा प्रवास आज संपतोय…तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल आभार मानून तुम्हाला परकं नाही करणार…नवीन कथेतून, नवीन पात्रातून तुम्हाला भेटायला येईन, आणि तेव्हाही तुम्ही असंच प्रेम कराल याची खात्री आहे…तूर्तास…येतो..” असं म्हणत हर्षदने पोस्टद्वारे त्याची भावना व्यक्त केली आहे.

हेही वाचा>> “मी त्याची…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारासाठी श्रेया बुगडेची खास पोस्ट

हेही पाहा>> Photos: अपूर्वा नेमळेकर की राखी सावंत? कोण मारणार बाजी? पाहा ‘बिग बॉस मराठी’तील टॉप १० स्पर्धकांची यादी

‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेआधी हर्षदने अनेक मालिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली. ‘सारे तुझ्याचसाठी’, ‘अंजली’, ‘दुर्वा’ या मालिकांमध्ये त्याने साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. आता त्याला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते आतूर आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor harshad atkari shared emotional post after phulala sugandh maticha serial end kak