सोशल मीडियावर नेहमी नवनवीन गाणी ट्रेंड होतं असतात. या ट्रेंडिंग गाण्यावर प्रत्येकजण व्हिडीओ करत असतो. सध्या सोशल मीडियावर संजू राठोड व प्राजक्ता घाग यांचं ‘गुलाबी साडी’ हे गाणं ट्रेंड होतं आहे. या गाण्याने लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना अक्षरशः वेडं लावलं आहे. धकधक गर्ल माधुरी दीक्षित, रेमो डिसुजा असे प्रत्येक कलाकार या गाण्यावर व्हिडीओ करताना दिसत आहेत. अशातच ‘गुलाबी साडी’ गाण्याची भुरळ अभिनेता जय भानुशालीच्या चिमुकल्या लेकीला पडली आहे. ‘गुलाबी साडी’ गाण्यावरचा तिच्या डान्स व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अभिनेता जय भानुशालीची लेक तारा नेहमी चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे ताराचे प्रत्येक व्हिडीओ व्हायरल होतं असतो. असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे, ज्यामध्ये तारा ‘गुलाबी साडी’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.
हेही वाचा – “होय, मी कपिल शर्मा शोची कॉपी केली…”, निलेश साबळेचं वक्तव्य चर्चेत, म्हणाला, “इंडस्ट्रीचा फायदा…”
काही दिवसांपूर्वी ताराचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या व्हिडीओत जयची लाडकी लेक ‘गुलाबी साडी’ गाण्याच्या काही स्टेप करताना दिसत आहे. ताराचा हा गोड व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे.
ताराच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. तिच्या एक्सप्रेशन, डान्सच कौतुक केलं जात आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “ही खूप गोंडस आहे. तिच्या डोळ्यातले निरागस भाव खूप छान आहेत.” दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “ही पॉवर-पॅक परफॉर्मन्स देते. एकही ठोका चुकवतं नाही. तिचे एक्सप्रेशन भारी असतात. अप्रतिम.” तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “खूपचं गोड आहे.”
हेही वाचा – ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेता झळकला नव्या मालिकेत, पाहा नवं रुप
ताराच्या या व्हिडीओला आतापर्यंत ३ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर १९ हजारांहून अधिक जणांनी लाइक केलं आहे. इन्स्टाग्रामवर ताराचे ३ लाख ५६ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. याआधी जय भानुशालीच्या लेकीचे बरेच व्हिडीओ व्हायरल झाले होते. दरम्यान, २०१९ला ताराचा जन्म झाला होता. आता ती पाच वर्षांची आहे.