अभिनेता जितेंद्र जोशीने आपल्या कसदार अभिनयाच्या जोरावर मराठी सिनेसृष्टीत अटळ स्थान निर्माण केलं आहे. अभिनयाबरोबर जितेंद्र त्याच्या संवाद कौशल्य आणि कवितेमुळे खूप चर्चेत असतो. सध्या तो ‘नाळ २’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. १० नोव्हेंबरला प्रदर्शित झालेला ‘नाळ २’मध्ये त्याने चैत्याच्या खऱ्या वडिलांची भूमिका साकारली आहे. त्यामुळे सध्या तो विविध कार्यक्रमात या चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकताच जितेंद्र जोशी ‘झी मराठी’वरील लोकप्रिय कार्यक्रम ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये सहभागी झाला होता. यावेळी जितेंद्र हा अमराठी असल्याचं समोर आलं. तेव्हा त्याने एक विधान करत मराठीची एक साधी व्याख्या सांगितली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा – दिवाळी पाडव्याला ‘ठरलं तर मग’ मालिकेतील कलाकार जुई गडकरीला देणार ‘हे’ खास गिफ्ट; अभिनेता अमित भानुशालीने केला खुलासा

अभिनेता जितेंद्र जोशींचा हा व्हिडीओ ‘झी मराठी’च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये सूत्रसंचालिका मृण्मयी देशपांडे सगळ्यांना सांगते की, “आज तुमच्यामध्ये सुद्धा एक असा कलाकार आहे, जो आपल्याला वाटतो या मातीमध्येच, मराठीच्या मांडीवरच बहुतेक हे लेकूर जन्माला आलेलं असणार आहे. इतकी मराठी त्याच्यामध्ये भिनलेली आहे. फार कमी लोकांना माहितेय तो मराठी नाही तो अमराठी आहे आणि त्याचं नाव आहे जितेंद्र जोशी.”

यावर जितेंद्र म्हणतो की, “मी जन्माने मारवाडी आहे. मी अमराठी नाही मी मराठीच आहे. राजस्थानात जन्माला आलेला मुसलमान राजस्थानी असतो. तसाच महाराष्ट्रात जन्माला आलेला मारवाडी हा मराठी आहे. पण फक्त एक आहे, घरामध्ये मराठी बोललं जात नव्हतं. त्यामुळे घरातली जी भाषा असते ती तुमची भाषा असते खरंतर. कारण तुम्ही जास्तीत त्या लोकांबरोबर बोलत असता. मग मुंबईत आल्यानंतर मला लक्षात आलं की, जर या क्षेत्रात काम करायचं असेल तर भाषा खूप महत्त्वाची आहे. त्याच्यावरून हिणवलं गेलं. मग मी शिकलो.”

हेही वाचा – ‘नवरा कुठे गेला?’ नेटकरीच्या प्रश्नावर सोनाली कुलकर्णीने दिलं जबरदस्त उत्तर, म्हणाली….

त्यानंतर मृण्मयी जितेंद्रला कविता सादर करायला सांगते. अभिनेता त्याच्या मित्राने लिहिलेली आईवरील एक सुंदर कविता सादर करतो. ही कविता सादर केल्यानंतर जितेंद्र मराठीची व्याख्या सांगतो. तो म्हणतो, “आताची मुलं येऊन भेटतात आणि म्हणतात, तुमचं मराठी काय सॉलिड आहे. तर मी म्हणतो, माझी मराठीची समज चांगली आहे. माझं मराठीचं ज्ञान नाहीये. मराठीचं ज्ञान पाहायचं असेल तर खूप माणसं आहेत. माझी समज चांगली आहे, मला मराठी आवडते. ही माझी भाषा आहे. कारण मला असं वाटतं, छत्रपती शिवाजी महाराज की असं म्हटल्यानंतर जो जय म्हणतो. ज्याच्या अंगावर काटा फुलतो तो मराठी. एवढी साधी व्याख्या आहे मराठीपणाची.”

हेही वाचा – भारदस्त आवाजाने महाराष्ट्राला थिरकायला लावणाऱ्या शिंदेशाहीचं उद्योग क्षेत्रात पाऊल; सुरू केला नवा पेट्रोल पंप

दरम्यान, अभिनेता जितेंद्र जोशीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. अनेक जण अभिनेत्याचं कौतुक करत आहेत. तसेच मराठीची व्याख्या छान सांगितली, असं नेटकरी म्हणतं आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor jitendra joshi talk about marathi people definition says chhatrapati shivaji maharaj pps
Show comments