झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ आणि त्यातील विनोदवीर वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत. केवळ महाराष्ट्रातच नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रेक्षकांकडून या कार्यक्रमाला पसंती मिळत आहे. या लोकप्रिय कार्यक्रमावर तमाम प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. सुरुवातीपासूनच या कार्यक्रमाला आणि त्यातील विनोदवीरांना महाराष्ट्राच नव्हे तर संपूर्ण जगाने डोक्यावर उचलून धरलं आहे. वेगवेगळ्या सामाजिक स्तरातील लोकं हा कार्यक्रम तितक्याच आवडीने पाहतात. या कार्यक्रमातील विनोदवीरांचे असंख्य चाहते आहेत. यातीलच एका विनोदवीराचे अभिनेते जॉनी लिवर यांनी कौतुक केले आहे.
बॉलिवूडचे कॉमेडी किंग म्हणून जॉनी लिवर यांना ओळखले जाते. ते ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम नेहमी पाहतात. नुकतंच जॉनी लिवर यांनी या कार्यक्रमातील एका विनोदवीराचे कौतुक केले आहे. जॉनी लिवर यांनी विनोदवीर रोहित चव्हाणचे कौतुक केले आहे. त्यांनी त्याला एक मेसेज केला आहे.
आणखी वाचा : “यांना कामधंदे नाहीत का?” अंथरुणाला खिळून असलेल्या वृत्तांवर वर्षा दांदळेंनी व्यक्त केला संताप
जॉनी लिवर यांनी रोहित चव्हाण यांना एक मेसेज केला आहे. “रोहित, जॉनी लिवर बोलतोय… तुम्ही चला हवा येऊ द्या मध्ये खूप चांगलं काम करतात. फारच मस्त. देव तुम्हाला आशीर्वाद देवो”, अशा शब्दात त्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यावर रोहितने ‘धन्यवाद सर’ असे म्हटले आहे.
आणखी वाचा : “आमचं लग्न…” वैभव तत्ववादीबद्दल प्रार्थना बेहरे स्पष्टच बोलली
दरम्यान रोहितने अनेक नाटक, मालिका, चित्रपट भूमिका साकारल्या आहेत. तसेच महाराष्ट्राचा कॉमेडीचा बादशाह हा किताब पटकावला आहे. काही दिवसांपूर्वी झी मराठीवर लोकप्रिय मालिका मिसेस मुख्यमंत्री त्याने बबन ही मध्यवर्ती भूमिका साकारली होती.
त्याने काळूबाईच्या नावानं चांगभलं या चित्रपटात काम केले होते. त्याबरोबर तो बळीराजाचे राज्य येऊ दे, मी अमृता बोलतेय, जोगवा, पांगिरा, सुपरस्टार, शर्यत, अतिथी, बोभाटा, बाबा लगीन, चूकभूल, बॉईज टू, बोला अलख निरंजन, तुझा दुरावा, बसता आणि भिरकीट यासारख्या अनेक चित्रपटात झळकला आहे.