अभिनेते कमल हासन अभिनयाच्या बरोबरीने आपली राजकीय मतांसाठी प्रसिद्ध आहेत. कमल हसन यांनी आजवर दाक्षिणात्य चित्रपटांच्याबरोबरीने हिंदीतदेखील काम केले आहे. ‘एक दुजे के लिये’ हा त्यांचा गाजलेला चित्रपट. नुकताच त्यांचा ‘विक्रम’ हा तामिळ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. आत हाच चित्रपट टीव्हीवरदेखील प्रदर्शित होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या दिवाळीत संध्याकाळी ५.३० वाजता विजय टीव्ही या चॅनेलवर या चित्रपटाचा प्रीमियर होणार आहे. चॅनलने एका खास प्रोमोसह आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही बातमी दिली आहे. सणासुदीच्या प्रसंगी हा चित्रपट टीव्हीवर दाखवल्याने त्याला चांगले रेटिंग मिळण्यास मदत होऊ शकते. ‘विक्रम’ हा एक अ‍ॅक्शन थ्रिलर आहे, ज्याचे लेखन आणि दिग्दर्शन लोकेश कनागराज यांनी केले आहे.

कमल हासन २०१८ मध्ये ते ‘विश्वरुमम’ चित्रपटात दिसले होते. हा चित्रपट तमिळ व्यतिरिक्त हिंदी भाषेत ३ जून २०२२ ला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता फहाद फासील विजय सेथुपथीचीदेखील महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटातून कमल हासन यांनी खऱ्या अर्थाने कमबॅक केले आहे. या चित्रपटाचा पुढील भागदेखील येणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor kamal haasans vikram to have its tv premiere this diwali spg