‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. काही जण त्याचं कौतुक करत आहेत. तर काही जण सहानुभूतीच्या बळावर त्याने ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व जिंकल्याचं म्हणत आहेत. अशातच एका मराठी अभिनेत्याची सूरज चव्हाणबद्दलची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. पण ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं. याच ट्रोलिंगवर आता अभिनेत्याने उत्तर दिलं आहे.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत झळकलेला अभिनेता कपिल होनरावने सूरज जिंकल्यानंतर एक पोस्ट लिहिली होती. एक व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिलं होतं, “१० वर्ष प्रायोगिक नाटकं, साडेतीन वर्ष टॉपची मालिका करून, स्वतःला अभिनेता म्हणून सिद्ध करून…. सिक्स पॅक अ‍ॅब्स करून, अभिनयावर काम करून…रोज ऑडिशन देतोय…पण एक लीडचं ( प्रमुख भूमिका ) ऑडिशन क्रॅक नाही होतं.. पण हा झापुक झुपूक बोलून ‘बिग बॉस’ची ट्रॉफी आणि लीड फिल्म घेऊन गेला राव…अभिनंदन सूरज… झापुक झुपूक शुभेच्छा…गुलीगत शुभेच्छा भावा खूप पुढे जा…”

Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
Manoj Jarange
Manoj Jarange : मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल, “खंडणीतला आरोपी तुमचं सरकार….”
Devendra Fadnavis and Divija Fadnavis
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांकडून लेक दिविजाचं तोंडभरून कौतुक; हुशारीचं वर्णन करताना म्हणाले, “तिच्यातील प्रगल्भता…”
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”
What Suresh Dhas Said About Munni?
Suresh Dhas : सुरेश धस यांचं वक्तव्य; “मुन्नी म्हणजे राष्ट्रवादीतला एक पुरुष, त्या मुन्नीने कुठेही चर्चेला यावं, मी…”

हेही वाचा – आलिया भट्टच्या लाडक्या लेकीला आवडतं ‘नाटू-नाटू’ गाणं, आईबरोबर ‘अशी’ नाचते, पाहा व्हिडीओ

या पोस्टनंतर कपिल होनरावला ट्रोल करण्यात आलं. याच ट्रोलिंगसंदर्भात त्याने नुकतीच एक भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. कपिलने लिहिलं आहे, “तुम्हा सर्वांवर देवाचा आशीर्वाद सदैव राहो…आई अंबाबाई तुम्हाला बुद्धी देवो…माझ्या पोस्ट मागची भावना तुम्हाला समजली नाही…मला आई बहिणीवरून शिव्या देणाऱ्यांनी आधी मी काय बोललो हे नीट वाचा…मी बैलाचा रोल केलाय, माझं थोबाड नीट नाही, मला आता कोण साइड रोल पण देणार नाही हे सगळं ठीक आहे. आधी मला काय म्हणायचं आहे ते समजून घ्या…मग शिव्या द्या….मी कधी ही सूरज अपात्र आहे. तो कसा जिंकला? त्याने जिंकू नये असं कधीच नाही बोललो…ना कधी त्याच्या रीलवर किंवा त्याच्या कंटेंटवर वाईट बोललो…आणि सूरजवर जळण्याचा प्रश्नचं येत नाही…ना मी ‘बिग बॉस’मध्ये होतो.. ना सूरज माझा स्पर्धक आहे…तो जे करतो ते मी ठरवलं तरी उभ्या आयुष्यात कधी करू शकणार नाही.”

पुढे कपिलने लिहिलं, “थिएटर, बॅक स्टेज, एकांकिका , टीव्ही करून मी इथे पर्यंत आलोय…जे काही छोटंस यश मिळालं…हे त्याचमुळे…आज ही संघर्ष करतोय…कुठे तरी मुख्य भूमिका मिळावी म्हणून…पण कुठे तरी मी कमी पडत असेल…मी अजून तितका चांगला अभिनेता नसेन…किंवा ते माझ्या नशिबात नसेल…पण यात सूरजला कुठेही मी कमी लेखत नाही, त्या बिचाऱ्याने खूप वाईट दिवस पाहिलेत…त्याचा ही संघर्ष आहे आणि आज त्याला जे काही मिळालं आहे त्याच्या मेहनतीने, साधेपणामुळे मिळालं आहे. सूरज या ७० दिवसांपूर्वी पण होता आणि फेमस होता…पण कर्लस मराठीने एक संधी दिली…त्याला ‘बिग बॉस’मध्ये घेऊन आले…त्याला थोडं फार ग्रुम केलं…आणि आज हे जे काही त्याला मिळालं आहे…भव्यदिव्य.. स्वप्नवत…त्याच्या नशिबाने…या क्षेत्रामध्ये नशीब खूप मोठा रोल प्ले करत .. हे मला बोलायचं होतं…. ज्यांनी छान कमेंट करून सपोर्ट केला त्यांना मनापासून धन्यवाद.. आणि बाकीच्यांना गॉड ब्लेस यू.”

हेही वाचा – “तुझी लायकी किती, उंची किती…”, पंढरीनाथ कांबळेवर टीका करताना अभिजीत बिचुकलेंची जीभ घसरली; म्हणाले, “ज्याला गेली २५ वर्ष…”

कपिल होनरावच्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्याने लिहिलं की, तुम्ही एक चांगले कलाकार आहात. तुमच्या मनात सूरजविषयी काहीच नव्हतं. तर दुसऱ्या चाहत्याने लिहिलं, “आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहायचं. लोक तर देवालापण बोलतात काही गोष्टी सोडून देण्यातच धन्यता मानलेली बरी.”

Story img Loader