अभिनेते किरण माने हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेतेही आहेत. त्यांच्या विविध पोस्टमुळे आणि वक्तव्यांमुळे ते कायमच चर्चेत असतात. आता त्यांनी वारीबाबत एक पोस्ट लिहिली आहे. संतांनी वारी काही टाईमपास म्हणून सुरु केली नव्हती असं किरण मानेंनी म्हटलं आहे. त्यांची ही पोस्ट चर्चेत आली आहे.

काय आहे किरण मानेंची पोस्ट?

“वारी ही लै लै लै नादखुळा गोष्ट आहे. खणत गेलं तर मानवतेचा खजिना सापडतो. आपल्या संतांनी असंच ‘टाईमपास’ म्हणून वारी आणि किर्तनपरंपरा सुरू केली नाही. माणसामाणसातले सगळे भेदभाव नष्ट करणारा खतरनाक विद्रोह होता तो. याचं जगात भारी उदाहरण म्हणजे पैठणचा हजरत इद्रिस हुसैनी सय्यद सादात दर्गा ! संत एकनाथांच्या पालखीसाठी जाणाऱ्या किंवा नाथषष्ठीसाठी आलेल्या दिंड्या याच दर्ग्यात मुक्कामाला थांबतात. तिथले मुस्लिम बांधव सगळ्या वारकऱ्यांची खूप प्रेमानं, उत्साहानं सेवा करतात. या मुक्कामात आपले वारकरी दर्ग्याला भक्तीभावानं पूजतात. मुस्लिम बांधवांकडून आपल्या वारकर्‍यांना जेवण दिलं जातं.

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!
Gashmeer Mahajani
“दिवसभर मद्यप्राशन करायचो, स्वत:ला सहा महिने कोंडून घेतलं…”, नैराश्यात गेलेला गश्मीर महाजनी, सांगितला ‘तो’ कठीण काळ
Vivek Oberoi
“मला अंडरवर्ल्डमधून धमक्यांचे फोन यायचे”, बॉलीवूड अभिनेता विवेक ओबेरॉय म्हणाला, “माझ्या रिलेशनशिपच्या…”
Uday Samant Post About Loksatta
Uday Samant : “‘लोकसत्ता’चा लोगो वापरुन खोडसाळ पोस्ट”, ‘त्या’ पोस्टवर काय म्हणाले उदय सामंत?
There should be no political interference in municipal programs says MLA Sneha Dubey Pandit in vasai
आमदार स्नेहा दुबे पंडित यांचा बविआला पहिला धक्का; “कार्यक्रमात राजकीय हस्तक्षेप नको”, पालिका अधिकार्‍यांना ताकीद

हे पण वाचा- किरण मानेंची पोस्ट, “आजही पूर्वीप्रमाणेच तुकोबा आणि अनगडशा फकीर एक झाले, तर अनेक कारस्थान्यांच्या..”

या दर्ग्यात भजन आणि नमाज दोन्ही अदा होतं

…विशेष म्हणजे या काळात या दर्ग्यात नमाज आणि भजन दोन्ही ‘अदा’ होतं ! ज्यावेळी मुस्लिम बांधवांच्या नमाजाची वेळ होते त्यावेळी वारकरी आपले भजन थांबवून ब्रेक घेतात आणि नमाज पूर्ण झाला की वारकरी परत भजन कंटिन्यू करतात !! एरवी सहज एकनाथांच्या दर्शनाला पैठणला गेलेला वारकरी मज़ारीवर माथा टेकूनच येतो. जे मुस्लीम भाविक दर्ग्यात येतात, ते एकनाथ महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय जात नाहीत.

संत एकनाथ महाराज आणि हजरत इद्रिस हुसैनी या दोन्ही महामानवांना या सलोख्याच्या वारीतनं आपल्या सगळ्यांना काहीतरी ‘मेसेज’ द्यायचाय. तो आपण समजून घेतला पाहिजे. ज्ञानेश्वरांनी सुरू केलेला ‘भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे’ हा विचार नामदेव, तुकोबारायांपास्नं आपल्या सगळ्या संतांनी अंगीकारला… तीच परंपरा आपल्या आज्ज्या-पणज्यांनी, बापजाद्यांनी जोपासत आपल्यापर्यन्त आणलीय. ती फुंकून आपल्या पुढच्या पिढ्यांच्या मनात, मेंदूत नफरतीचं विष पेरायचं, का आपल्या बापजाद्यांचा प्रेमाचा वारसा समृद्ध करायचा हे आपलं आपण ठरवायचंय. आपल्या धडावर ‘आपलंच’ डोकं आहे…

किरण माने

९ दिवसांपूर्वीच किरण मानेंनी अनगडशा फकिराचं उदाहरण देत सरकारला टोला लगावला होता. तसंच नीट परीक्षेच्या गोंधळावरुन आणि लोकसभेत राहुल गांधींनी जे भाषण केलं त्यावरुनही त्यांनी पोस्ट केल्या होत्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी मुस्लीम धर्म आणि हिंदू धर्माची सांगड घालत ती परंपरा वारीत कशी जपली गेली हे सांगणारी पोस्ट लिहिली आहे.

Story img Loader