‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वामुळे किरण माने प्रसिद्धीझोतात आले. किरण माने सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची बरीच माहिती आणि अनुभव ते इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात. किरण मानेंनी नुकत्याच केलेल्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “ओंक्या तू गद्दार आहेस”, ओंकार भोजनेच्या नाराज चाहत्याला दिले नम्रता संभेरावने उत्तर; म्हणाली, “त्याच्या…”

अभिनेते किरण माने लवकरच एका नव्या भूमिकेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. याबाबत इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून त्यांनी ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे. अभिनेते ‘सिंधुताई…माझी माई’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. या मालिकेत ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचा जीवनपट दाखवण्यात येणार आहे.

हेही वाचा : “तुझं घर स्वर्गासारखं आणि बायको…” सिद्धार्थ चांदेकरच्या लंडनमधील व्हिडीओवर मिताली मयेकरने केली भन्नाट कमेंट

किरण माने यांची पोस्ट

…लवकरच मला बघा एका जबरदस्त भूमिकेत ! तुम्हाला भारून टाकेल, हळवं करेल आणि प्रेरणाही देईल अशा अफलातून कलाकृतीत…

शाळा सुटल्यावर लेकरं घराकडं ज्या ओढीनं धावत येतात…
सासुरवाशीण ज्या आतुरतेनं माहेराकडं धाव घेते…
‘पंढरी’ हाकेच्या अंतरावर आल्यावर वारीतला वारकरी ज्या बेभानपणे धावा करतो…
अगदी तसंच, तुम्ही दुसर्‍या कुठल्याबी चॅनलवर काहीही बघत असाल, तर ते चॅनल बदलून ‘कलर्स मराठी’ कडे धाव घेऊन ‘सिंधुताई…माझी माई !’ बघण्यासाठी आतूर व्हाल… एवढी अफाट ताकद असलेलं मनोवेधक कथानक घेऊन येतोय… १५ ऑगस्टपासून !

हेही वाचा : वरुण धवन आणि जान्हवी कपूरचा ‘बवाल’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित; दुबईत लॉन्च होणार ट्रेलर

“सिंधुताई माझी माई – गोष्ट चिंधीची” ही नवी चरित्रकथा ‘कलर्स मराठी’वर १५ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. या मालिकेत अभिनेते किरण माने कोणती भूमिका साकारणार याबाबत अद्याप त्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र, एका युजरने त्यांच्या पोस्टवर “किरण सर तुम्हाला कोणत्याही भूमिकेत पाहायला आवडेल…” अशी कमेंट केली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor kiran mane will play an important role in the series based on sindhutai sapkal sva 00