‘शक्तिमान’, ‘गुटुर गू’ अशा विविध मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारे अभिनेते के. के. गोस्वामी यांचा मुलगा एका मोठ्या दुर्घटनेतून बचावला आहे. मुंबईत त्यांच्या गाडीने पेट घेतला. या वेळी त्यांचा मुलगा नवदीप ही गाडी चालवीत होता. या घटनेमुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना एस. व्ही. रोडवर घडली. के. के. गोस्वामी यांचा मुलगा कारने आपल्या घरातून फिल्मिस्तान स्टुडिओजवळ असलेल्या कॉलेजमध्ये जात होता. नवदीप कार चालवीत असताना गाडीला अचानक आग लागली. यानंतर लगेचच अग्निशमन दल आणि मुंबई पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली.

abhijeet kelkar post on aarya slapped nikki tamboli
“…ते तुला नक्की एक संधी देतील”, निक्कीला मारणाऱ्या आर्याला ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्याने दिला ‘हा’ सल्ला
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Thane Suicide youth, highly educated youth thane,
ठाणे : उच्च शिक्षित तरुणाची आत्महत्या
Reclaim the night womens in kolkat took out these night marches
स्री-‘वि’श्व: ‘रिक्लेम द नाइट’
Pimpri, pimpri chinchwad, rickshaw accident, potholes, road disrepair, municipal corporation, Nigdi police
पिंपरी : खड्ड्याने घेतला महिलेचा जीव
Anurag dead body, post-mortem, custody,
शवविच्छेदनानंतर अनुरागचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात
CIDCO is in the process of giving land at a strategic location in Airoli sector to a large industrial group for the construction of a township
ऐरोलीतील मोक्याची जागा बड्या उद्याोगपतीला? टाऊनशिप उभारणीच्या नावाखाली ‘सिडको’चे अजब धोरण
police Nagpur dance, police dance suspended nagpur,
VIDEO : ‘खैके पान बनारस वाला’ गाण्यावर डान्स अन् निलंबनाची कुऱ्हाड; नागपुरातील ते चार पोलीस…

आणखी वाचा : ‘द कपिल शर्मा शो’ लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप, कारण आलं समोर

या अपघातातून के. के. गोस्वामी यांचा मुलगा थोडक्यात बचावला आहे. नवदीपला कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नाही. हे सगळे कसे घडले हे अजून समजू शकलेले नाही. कारला आग कशामुळे लागली याचा आता पोलीस तपास करीत आहेत.

हेही वाचा : एकता कपूरच्या सुपरहिट मालिकेतून तेजस्वी प्रकाश घेणार एग्झिट? एका एपिसोडसाठी आकारते ‘इतके’ मानधन

के. के. गोस्वामी हे टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांनी आतापर्यंत हिंदी, मराठी, बंगाली, गुजराती, भोजपुरी अशा विविध भाषांमध्ये काम केले आहे. ‘शक्तिमान’, ‘गुटुर गू’, ‘ज्युनियर जी’, ‘भाभी जी घर पर हैं’, ‘शका लका बूम बूम’, ‘सीआयडी’, ‘चक्रवर्ती अशोक सम्राट’ अशा विविध मालिकांमध्ये काम करीत त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता त्यांच्या गाडीला झालेल्या या दुर्घटनेबाबत त्यांचे चाहते चिंता व्यक्त करीत आहेत