अभिनेता मनीष पॉल हा हिंदी मनोरंजन सृष्टीतील एक बहुआयामी अभिनेता आहे. अल्पावधीतच त्याने प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. आज त्याच्या अभिनयाचे, त्याच्या विनोद बुद्धीचे लाखो चाहते आहेत. परंतु त्याचा हा प्रवास सोपा नव्हता. एक काळ असा होता की त्याच्याकडे काही काम नव्हतं. आता त्याने त्या दिवसांमधील आठवणी जगवल्या आहेत.
आणखी वाचा : प्रसिद्ध होस्ट मनीष पॉलचे ओटीटी विश्वात पदार्पण! दिसणार एका हटके भूमिकेत
‘हुमन्स ऑफ बॉम्बे’ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “२००७ साली माझं लग्न झालं. त्यानंतर २००८ साली माझ्याकडे काम नव्हतं. ते मी स्वेच्छेने करत नव्हतो. करण मी जे काम करत होतो त्यात मला मज्जा येत नव्हती. मी हे करण्यासाठी इथे आलो नाहीये असं मला वाटू लागलं होतं. मला पर डे प्रमाणे पैसे कमवायचे नव्हते. पण घरी आल्यावर मला आनंदी वाटेल असं काम मला करायचं होतं.”
पुढे तो म्हणाला, “मी सगळं सोडलं आणि घरी बसलो. माझ्याकडे पैसे नव्हते, मी काहीही कमवत नव्हतो. माझ्याकडे घराचं भाडं भरायलाही पैसे नव्हते. तेव्हा माझ्या पत्नीने आमच्या घराची आर्थिक जबाबदारी उचलली. ती सगळं काही बघायची. ते संपूर्ण वर्षं माझ्यासाठी खूप कठीण होतं. दोन-तीन वेळा या परिस्थितीमुळे मी कोलमडून गेलो होतो. पण मी स्वतःला सावरलं. यात मला माझ्या पत्नीने खूप मदत केली.”
हेही वाचा : “तुम्ही गुटखा खाता का?” नेटकऱ्याच्या कमेंटवर ‘तारक मेहता…’तील चंपक चाचांनी दिलं रोखठोक उत्तर, म्हणाले…
शेवटी तो म्हणाला, “त्यानंतर २००९ साली ‘घर घर में’ हा कार्यक्रम आला आणि त्याला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. मी त्या कार्यक्रमात काम केलं आणि ते करणं खूप एंजॉय केलं. मी या कार्यक्रमात खूप मनापासून काम केलं.”