बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेता मोहित रैनाने उत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. कामामुळे सतत चर्चेत असणाऱ्या या अभिनेत्याचं खासगी आयुष्यही चर्चेचा विषय ठरलं. मोहितने जानेवारी २०२२मध्ये अदिती शर्माशी लग्न केलं. पण मध्यंतरी मोहित व अदितीमध्ये काहीतरी बिनसलं असल्याच्या चर्चा सुरू होत्या. पण या चर्चा निव्वळ अफवा असल्याचं मोहितने म्हटलं होतं. आता त्याने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – Video : लेकीच्या लग्नाचा आनंद गगनात मावेना, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा होणाऱ्या जावयाबरोबर भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

मोहितची पत्नी अदिती गरोदर होती. आता त्याने एक फोटो पोस्ट करत गुडन्यूज दिली आहे. मोहितच्या घरी एका चिमुकलीचं आगमन झालं आहे. मोहित-अदितीला कन्याप्राप्ती झाली आहे. मोहितने लेकीच्या हाताचा हात हातात पकडत फोटो शेअर केला. त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

आणखी वाचा – खरंच की काय! ही सुप्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री आहे सहा मुलांची आई? मुलाखतीत केला अजब खुलासा

मोहित फोटो शेअर करत म्हणाला, “आता आम्ही तिघं जणं आहोत. सुंदर मुलीचं या जगामध्ये स्वागत”. मोहितने ही पोस्ट शेअर करताच चाहत्यांसह कलाकार मंडळी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. हर हर महादेव म्हणत अनेकांनी कमेंट केल्या आहेत. तर महादेव यांच्या घरी एका सुंदर मुलीचा जन्म झाला आहे अशाही कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत.

आणखी वाचा – अभिनयासह आता महेश मांजरेकरांच्या मुलाने सुरू केलं स्वतःचं हॉटेल, नावही आहे फारच खास

काही महिन्यांपूर्वी मोहितने लग्नाचे सर्व फोटो डिलिट केले होते. एवढंच नाही लग्नानंतर पत्नीबरोबर शेअर केलेले सगळेच फोटो त्याने डिलिट केले. त्यामुळे या दोघांच्या घटस्फोटाच्या जोरदार चर्चा रंगत होत्या. दरम्यान एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून अदितीला भेटला होता. मोहितनेच अदितीला प्रपोज केलं होतं. त्यानंतर काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न केलं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor mohit raina blessed with baby girl share photo on social media says and then just like that we became 3 see pic kmd