‘देवों के देव महादेव’, ‘महाभारत’ या छोट्या पडद्यावरील मालिकांमुळे अभिनेता मोहित रैना प्रसिद्धीझोतात आला. मालिकांशिवाय २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘उरी – द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटात अभिनेत्याने महत्त्वाची भूमिका केली होती. अभिनेत्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगायचं झालं, तर त्याचा जन्म काश्मीरमध्ये झाला आहे. अलीकडेच रणवीर अल्लाहबादियाला दिलेल्या मुलाखतीत मोहितने त्याच्या बालपणीच्या थरारक आठवणी सांगितल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “शाहरुख खान आणि ॲटली यांनी जबरदस्तीने…”, ‘जवान’मधील कलाकाराचा मोठा खुलासा

मोहित रैनाला रणवीरने तुम्हाला आजही काश्मीरची आठवण येते का? असा प्रश्न विचारला. यावर अभिनेता म्हणाला, “काश्मीरमधील आठवणी मी कधीच विसरणार नाही. मी जवळपास ८ ते ९ वर्षांचा असताना आम्ही काश्मीर सोडलं. माझं संपूर्ण बालपण तिकडे गेलं…तो काळ खूप कठीण होता. आजही प्रत्येक गोष्ट मला आठवते. माझ्या डोळ्यासमोर मी माझी शाळा जळताना पाहिली आहे. सतत मृत्यूची भीती वाटायची…सकाळी शाळेत जाताना गोळीबार सुरु असायचा ते पाहून आपण घरी सुखरुप येऊ की नाही? याची खात्री नसायची.”

हेही वाचा : प्रियाचा खोटेपणा अर्जुन सर्वांसमोर आणेल का? ‘ठरलं तर मग’ मालिकेत येणार रंजक वळण, जुई गडकरीने शेअर केला प्रोमो

अभिनेता पुढे म्हणाला, “लहानपणापासून आपल्या भारतीय सैनिकांना मी खूप जवळून पाहिल्यामुळे मला त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे. युनिफॉर्मबद्दल खूप आदर असल्याने एखाद्या चित्रपटात सैनिकाची लहानशी भूमिका मिळाली, तरी मी सोडत नाही. त्या भूमिकेला पूर्ण न्याय देण्याचा मी प्रयत्न करतो.”

हेही वाचा : “…म्हणून मी बाजूला झाले”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये परतण्याबद्दल विशाखा सुभेदार यांचं स्पष्ट वक्तव्य

“आई-वडिलांबरोबर बाहेर जात असताना वयाच्या आठव्या वर्षी मी भर रस्त्यात गोळीबार सुरु असल्याचं पाहिलं आहे. रस्त्याच्या एका बाजूला मी आई-वडिलांसह उभा होतो, तर दुसऱ्या बाजूला माझे भाऊ-बहीण उभे होते आणि बरोबर रस्त्याच्यामध्ये गोळीबार सुरु होता. या गोष्टी आज आठवतात तेव्हा जीवनात आपण खूप काही पाहिलंय याची जाणीव होते.” असं मोहित रैनाने सांगितलं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor mohit raina recalls childhood in kashmir says he watched his school burn sva 00