मराठी सिनेसृष्टीत असे बरेच कलाकार आहेत, ज्यांनी आपल्या अभिनयाबरोबर नृत्याने सगळ्यांची मनं जिंकली आहेत. अमृता खानविलकर, भार्गवी चिरमुले, सोनाली कुलकर्णी, पुष्कर जोग, पूजा सावंत, मानसी नाईक असे अनेक कलाकार मंडळी उत्कृष्ट नृत्य करतात. यापैकी एक म्हणजे अभिनेता नकुल घाणेकर. गेल्या कित्येक वर्षांपासून नकुल नृत्याबरोबर अभिनयाची आवड जोपासताना दिसत आहे. कथ्थक आणि साल्सा बचाटा हे नृत्य तो शिकवतो. अलीकडेच नकुल घाणेकरने एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या दोन वर्षांहून अधिक काळापासून अभिनेता नकुल घाणेकर ‘सोनी टीव्ही’वरील ‘गाथा नवनाथांची’ मालिकेत पाहायला मिळत आहे. या मालिकेत नकुल गोरक्षनाथ आणि महादेव या दोन्ही भूमिका एकत्र साकारताना दिसत आहे. अलीकडेच नकुलने २० वर्षांपूर्वी कथ्थक शिकताना आलेला अनुभव आणि आताची परिस्थिती याबद्दल पोस्ट लिहिली होती.

हेही वाचा – निक्कीमुळे अरबाज पटेलचं ब्रेकअप? गर्लफ्रेंडने नाव घेत केली पोस्ट; म्हणाली, “मला त्याच्याबद्दल…”

नकुल घाणेकरचा अनुभव वाचा…

एक व्हिडीओ शेअर करत अभिनेत्याने लिहिलेलं होतं, “२० वर्षांपूर्वी कथ्थक हे पुरुषांसाठी जवळजवळ निषेधार्थ होतं. आता यामध्ये खूप बदल झाला आहे. कथ्थक शिकणाऱ्या पुरुषांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. पण तरीही तो पूर्णपणे ३६० अंश बदल झालेला नाही. मात्र योग्य दिशेने चांगला बदल हळूहळू होतं आहे.”

नकुलने शेअर केलेल्या व्हिडीओवर देखील लिहिलं आहे. त्यानं लिहिलं आहे की, लहानपणी कथ्थक शिकतो म्हणून नाच्या, बायल्या, छक्का असं सगळे चिडवायचे. पायात घुंगरू घालणारा पुरुष नाही स्त्री असते, असं सगळे म्हणायचे. पण माझे बाबा शास्त्रज्ञ अशोक घाणेकर आणि आई विद्या घाणेकर ह्यांनी कधीच नाच सोड असं नाही म्हटलं. नेहमी माझी साथ दिली…आता खूप प्रोत्साहक वातावरण आहे. पुरुष शास्त्रीय नर्तकांसाठी २० वर्षांपूर्वी अवघड वाटत होतं. ..आता माझी नृत्य संस्था कार्यकरत आहे. २५हून अधिक मुलगे कथ्थक शिकून गेले आहेत. मला याचा अभिमान आहे. सध्या सहा मुलगे सातत्याने क्लासला येतात. त्यातला एक लवकरच विशारद होईल.

हेही वाचा – कोल्हापुरी हलगीवर नम्रता संभेरावने पतीसह धरला ठेका! नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आपली संस्कृती…”

नकुलच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “मंथनातून निर्माण झालेलं विष फक्त शिवच प्राशन करू शकतो…तू ज्या जिद्दीने हा प्रवास केला आहेस…त्याला सलाम.” तसंच दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, तुमच्यासारख्यांनी खूप सोसले म्हणूनच पुढच्यांना थोडफार सुकर झालं आहे. शिवाय आताच्या पिढीचा, समाजाचा दृष्टीकोन बदलतो आहे. तुम्हाला सलाम. तर तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “कथ्थक नृत्याचे देव म्हणून आपण नटराजचे पूजन करतो. तर हे फक्त स्त्रीच नृत्य कसे असू शकते? नृत्य हे आनंद देवाणघेवाणचे माध्यम आहे. त्याला बंधनात अडकवून ठेवणं शक्य नाही हे तुम्ही सिद्ध केलंय.”

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor nakul ghanekar shares his experience of learning kathak pps