छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेते नितेश पांडे यांच्या निधनानंतर कलाक्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे नितेश यांचा मृत्यू झाला. ते ५१ वर्षांचे होते. निधनापूर्वी नितेश इगतपुरी येथे चित्रीकरण करत होते. नितेश यांच्या निधनाची बातमी कळताच अनेक कलाकार मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. दरम्यान नितेश यांची शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नितेश सोशल मीडियावर अधिक सक्रिय नव्हते. इन्स्टाग्रामवर अकाऊंटद्वारे काही मोजक्याच पोस्ट त्यांनी शेअर केल्या आहेत. २१ फेब्रुवारीला त्यांनी शेवटची पोस्ट शेअर केली होती. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी म्हटलं होतं की, “काहीच कॅप्शन नाही. खूप दिवसांनी असंच काही पोस्ट करत आहे”. या व्हिडीओमध्ये नितेश कामामधून ब्रेक घेत फिरायला गेले असल्याचं दिसत आहे.

आणखी वाचा – ‘अनुपमा’ फेम अभिनेता नितेश पांडेंचं निधन, कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे मृत्यू

या व्हिडीओमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद पाहून चाहतेही हळहळले आहेत. नितेश यांचा शेवटचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी यावर विविध कमेंट केल्या आहेत. तुम्ही कायम आमच्या आठवणींमध्ये असणार, आम्ही तुम्हाला मिस करू, तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली, तुम्ही खूप लवकर आम्हाला सो़डून गेलात असं म्हणत चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.

आणखी वाचा – ५१व्या वर्षी कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे मृत्यू, निधनापूर्वी नितेश पांडे कुठे होते? अभिनेत्याच्या मृत्यूबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीची नवी माहिती

नितेश यांच्या अचानक जाण्याने सगळ्यांनाच दुःखद धक्का बसला आहे. त्यांनी पत्नी अर्पिता पांडे यांनीही एक अभिनेत्री म्हणून काम केलं आहे. नितेश ‘अनुपमा’ या मालिकेत शेवटचे दिसले होते. ‘ओम शांती ओम’ या चित्रपटात त्यांनी साकारलेली भूमिका लक्षवेधी ठरली होती. याशिवाय ‘दबंग २’, ‘खोसला का घोसला’ या चित्रपटांतही त्यांनी काम केलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor nitesh pandey passed away at the age of 51 his last video goes viral on social media see details kmd