अभिनेता प्रसाद खांडेकर हा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून घराघरात पोहोचला. विनोदबुद्धी आणि अभिनय कौशल्याने तो प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडतो. विनोदाचं अचूक टायमिंग साधत प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा प्रसाद रुपेरी पडद्यावर दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकतंच प्रसाद खांडेकरने कुर्रर्रर्रर्र नाटकाच्या शतक महोत्सवी प्रयोगादरम्यानचा एक फोटो शेअर केला आहे. त्याला लिहिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रसाद खांडेकरने इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असते. प्रसादने नुकतंच काही फोटो शेअर केले आहेत. यात प्रसाद खांडेकर त्यांनी नाटकापूर्वीचे काही फोटो शेअर केले आहेत. त्याबरोबर त्यांनी रंगभूमीवर काही फोटोही पोस्ट केले होते. त्याला त्यांनी छान चांगले कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : Video : किरण माने-राखी सावंतचा ‘तो’ व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी नाराज, म्हणाले “फक्त टीआरपीसाठी…”

प्रसाद खांडेकरची पोस्ट

“आमच्या कुर्रर्रर्रर्र ह्या नाटकाचा शतकमहोत्सवी प्रयोग मान्यवरांच्या उपस्थितीत 31 डिसेंबर ला मोठ्या दिमाखात पार पडला …

स्वतःच्या नाटकाची ट्रॉफी सगळ्या टीमच्या हातात बघून भारी वाटत होतं …. कोरोना काळात मोठ्या धाडसाने सुरू झालेल्या आमच्या ह्या नाटकाने हाऊसफुल चे बोर्ड घेत पुरस्कार मिळवत मिळवत वर्षभरातच शंभरी गाठली ह्या धाडसाबद्दल निर्माती विशाखा ताई , उमेश दादा , पूनम ताई आणि महेश दादा ह्याचं खरंच कौतुक .निर्मात्याच कौतुक अजून एका गोष्टीसाठी प्रायोगांच्या तालमी पासून ते आता शतकमहोत्सवी प्रयोग होईपर्यंत कुठे ही काही ही कमी पडू दिले नाही ….आम्हा कलाकारांचे लाड करत करत हे प्रयोग पार पडले ….. आम्हा कलाकारांच्या सगळया तारखा सांभाळत चांगल्या तारखा करत 100 प्रयोगांचा टप्पा गाठणं ह्यासाठी गोट्या काकांचे सुद्धा आभार ….. संपूर्ण टेक्निकल पडद्याआड काम करणारी बॅकस्टेज ची टीम.

माझी सहाय्यक दिगदर्शक ….माझे टेक्निकल हेड……….सुनील आणि हेरंब ही मॅनेजमेंट ची टीम सगळ्यांचे मनःपूर्वक आभार ….माझे सहकलाकार पॅडी दा विशाखा ताई आणि नमा …तुम्हा तिघांशिवाय ह्या नाटकाला न्याय मिळणं कठीण होत …थँक्स आणि सरते शेवटी सर्वात महत्वाचे मायबाय रसिक प्रेक्षक …तुमचे आभाळाएव्हढे आभार कारण आम्ही कलाकारांनी किती ही जीव तोडून काम केलं आणि कलाकृती उभी केली तरी ती कलाकृती डोक्यावर घ्यायची की ती जमिनीवर आपटायची हे सर्वस्वी तुमच्या हातात असत आणि माझ्या ह्या कलाकृती वर भरभरून प्रेम केलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि खुप प्रेम …. कुर्रर्रर्रर्र अजून शेकडो प्रायोगांचा टप्पा पार करेल ह्यात शंका च नाही. मोरया”, असे त्यांनी या कॅप्शन दिले आहे.

आणखी वाचा : Tunisha Sharma suicide case: “तिची आई तिचा छळ…” तुनिषा शर्माच्या मामाने केला खुलासा

दरम्यान प्रसाद खांडेकर हा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून घराघरात पोहोचला. विनोदबुद्धी आणि अभिनय कौशल्याने तो प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडतो. काही दिवसांपूर्वी विनोदाचं अचूक टायमिंग साधत प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा प्रसाद रुपेरी पडद्यावर दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor prasad khandekar share instagram post kurr drama caption nrp