Pravin Tarde Post For Suraj Chavan: बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण (Bigg Boss Marathi 5 Winner Suraj Chavan) ठरला. टीव्हीवरील या लोकप्रिय रिअॅलिटी शोचा ग्रँड फिनाले रविवारी (६ ऑक्टोबरला) दणक्यात पार पडला. सर्व स्पर्धकांना मागे टाकत सूरज चव्हाणने बाजी मारली, तर गायक अभिजीत सावंत उपविजेता ठरला. सूरजने हा शो जिंकल्यावर अनेक सेलिब्रिटी आणि राजकीय नेते पोस्ट करून त्याला शुभेच्छा देत आहेत. दिग्दर्शक, अभिनेते प्रवीण तरडेंनी सूरजसाठी पोस्ट केली आहे.

प्रवीण तरडे यांनी फेसबूकवर सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता झाल्यावर पोस्ट केली आहे. त्यांनी सूरजचा ट्रॉफीबरोबरचा एक फोटो शेअर करत लिहिलं, “सूरज मित्रा तु फक्त ट्रॅाफी नाही तर सगळ्यांची मनंसुद्धा जिंकलीस. साधेपणा, सच्चेपणा कायम येक नंबरच राहतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.”

ajit pawar meets sharad pawar
पहिला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Ravindra Waikar And Amol Kirtikar
Ravindra Waikar : रवींद्र वायकरांची खासदारकी जाणार की राहणार? मुंबई उच्च न्यायालयाने राखून ठेवला निर्णय
ankita walawalkar fiance kunal express gratitude towards dhananjay powar
“दादा लग्नाला या, जोरात कानात पिळा…”, धनंजयच्या व्हिडीओवर अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची कमेंट, आभार मानत म्हणाला…
suraj chavan meet dcm ajit pawar
“देवमाणूस आहेत दादा…”, अजित पवार उपमुख्यमंत्री होताच सूरज चव्हाण पोहोचला मंत्रालयात! नव्या घराबद्दल म्हणाला…
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं पहिलंच दमदार भाषण, देवेंद्र फडणवीसांनाही केलं लक्ष्य!
What Ashok Chavan Said About Congress?
Ashok Chavan : “रेवंथ रेड्डींकडे भोकर विधानसभेची जबाबदारी दिली होती, प्रचंड पैसा…”; श्रीजया यांच्या विजयानंतर काय म्हणाले अशोक चव्हाण?
Sharad Pawar On Mahavikas Aghadi
Sharad Pawar : विधानसभेतील पराभवानंतर आता ‘मविआ’चं भविष्य काय? शरद पवारांनी सांगितली पुढची रणनीती

हेही वाचा – Bigg Boss Marathi 5 चा विजेता सूरज चव्हाणसाठी सुप्रिया सुळेंची पोस्ट, म्हणाल्या, “आपल्या बारामतीचा…”

बारामतीच्या सूरज चव्हाणने या शोमधील ७० दिवसांच्या प्रवासानंतर बिग बॉसचे विजेतपद पटकावले. अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, जान्हवी किल्लेकर व अंकिता प्रभू वालावलकर हे बिग बॉसमधील टॉप ६ स्पर्धक होते. यांच्यापैकी सर्वात आधी जान्हवी किल्लेकरने ९ लाख रुपये रोख घेऊन शो सोडला.

हेही वाचा – Bigg Boss Marathi 5 चा उपविजेता ठरलेल्या अभिजीत सावंतची पहिली पोस्ट; म्हणाला, “मला जे वाटतंय ते…”

जान्हवीनंतर अंकिता प्रभू वालावलकर घराबाहेर गेली, त्यानंतर डीपी म्हणजेच धनंजय पोवार विजेत्याच्या शर्यतीतून बाद झाला. त्यानंतर निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, सूरज चव्हाण हे टॉप ३ ठरले. त्यापैकी निक्की घराबाहेर पडली आणि सूरज चव्हाण व अभिजीत सावंत टॉप २ होते. जास्त मतं मिळाल्याने अभिजीतला मागे टाकत सूरज चव्हाण या पर्वाचा विजेता ठरला.

हेही वाचा – Bigg Boss Marathi 5: ९ लाख रुपये घेऊन खेळ सोडल्यावर जान्हवी किल्लेकरची पहिली पोस्ट, म्हणाली, “७० दिवसांच्या…”

बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाच्या विजेत्याची घोषणा झाल्यानंतर सगळीकडे सूरज चव्हाणचीच चर्चा आहे. सूरजवर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अगदी लिहिता-वाचता येत नसलेल्या सूरजने ७० दिवसांच्या प्रवासात साधेपणाने प्रेक्षकांची मनं जिंकली आणि या शोची ट्रॉफी जिंकली.

Story img Loader