अभिनेता रोहित रॉयची मुलगी कियारा अमेरिकेत शिकत आहे. रोहितला त्याच्या मुलीची खूप आठवण येत होती, त्यामुळे त्याने थेट तिला भेटून सरप्राइज द्यायचं ठरवलं. मुलीला भेटण्यासाठी २० तासांचा प्रवास करून रोहित अमेरिकेला गेला. तिला बघून त्याची मुलगी रडू लागली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रोहित एका मुलाखतीत म्हणाला, “मी माझ्या मुलीला सरप्राईज देण्यासाठी अमेरिकेला गेलो होतो. मी तिच्या रूमच्या दारात पोहोचलो. मला वाटतं त्यादिवशी रविवार होता. सकाळीच मी पोहोचलो, तिने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली, ‘तू इथे आहेस का?’ भास होत आहे असं समजून ती मला पाहून रडू लागली.” युनिव्हर्सिटीत कियारा शेवटच्या वर्षात शिकत आहे. ती अभ्यासात खूप हुशार आहे, असं रोहितने सांगितलं.

हेही वाचा – अभिनेत्री हंसिका मोटवानीसह तिच्या आई अन् भावाविरोधात वहिनीची पोलीस तक्रार, तीन वर्षांपूर्वी झालंय लग्न

रोहित म्हणाला, “ती ब्राऊन युनिव्हर्सिटीत शेवटच्या वर्षात शिकत आहे आणि मला तिची फार आठवण येत होती. बाबा भावना व्यक्त करत नाहीत, आम्हाला काय वाटतं ते आम्ही कोणालाही काहीही सांगू शकत नाही. मी विचार केला, ‘काय करू?’ मग मी तिकीट काढलं आणि तिला भेटायला गेलो. मी एकटाच होतो. मानसीही (रोहितची पत्नी) काहीच बोलली नाही. मी रात्री पोहोचलो आणि सकाळी टॅक्सी बूक करून तिच्याजवळ गेलो. आम्ही बापलेक सात दिवस एकत्र राहिलो. असे दिवस मी कधीच घालवलेले नाहीत. तो क्षण रेकॉर्ड करण्यासाठी माझ्याकडे कोणीच नव्हतं याची खंत वाटते.”

हेही वाचा – ९ फ्लॉप चित्रपट, तरीही नाकारला ९०० कोटी कमावणारा बॉलीवूड सिनेमा; नेत्याशी लग्न केलं अन्…; कोण आहे ही अभिनेत्री?

रोहितला मुलीबरोबरच्या भेटीचे काही क्षण कॅमेऱ्यात रेकॉर्ड करायचे होते, पण नंतर त्याने तो विचार बदलला. “मला वाटलं हल्ली मुलं काहीही बोलतात आणि ती काही बोलली असती तर? माझा संपूर्ण २० तासांचा प्रवास वाया गेला असता. कियाराला जास्त फोटो आणि व्हिडिओ काढायला आवडत नाहीत,” असं रोहितने सांगितलं. तो क्षण रेकॉर्ड केला नसला, तरीही आयुष्यभर आठवणीत राहिल असा मनावर कोरला गेलाय, असं रोहितने नमूद केलं.

हेही वाचा – शक्ती कपूर यांनी ‘या’ अभिनेत्रीला घर घेण्यासाठी देऊ केलेली मदत; खुलासा करत म्हणाली, “त्या काळी ५० हजार रुपये…”

यापूर्वी रोहितने मुलीचं कौतुक केलं होतं. “मी पृथ्वीवरील सर्वात नशीबवान माणूस आहे की मला कियारासारखी मुलगी आहे. ती तिला हवं तसं आयुष्य जगते. ती खूप अभ्यासू आहे,” असं रोहित म्हणाला होता.

रोहितच्या मुलीला झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’मध्ये काम करण्याची ऑफर देण्यात आली होती, परंतु तिला तिचं शिक्षण पूर्ण करायचं असल्याने तिने ऑफर नाकारली. “दीड वर्षापूर्वी मी शबाना आझमी यांनी आयोजित केलेल्या फॅशन इव्हेंटला गेलो होतो. तिथे बरेच स्टार्स होते. त्यानंतर मला आर्चीजसाठी फोन केला होता. मी त्यांना सांगितलं की ती ब्राऊन युनिव्हर्सिटीत शिकत आहे पण मी तिला विचारतो. मी तिला सांगितलं, मात्र ती काम करू शकली नाही. मी तिला सांगितलंय की तू तुझं शिक्षण पूर्ण केल्यावर तुला या क्षेत्रात यायचं असेल तर आम्ही तुला पूर्ण पाठिंबा देऊ,” असं रोहित म्हणाला.