Himachal Pradesh Rain: उत्तर भारतात मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक राज्यांमध्ये पावसाने हाहाकार माजवला असून नद्यांना पूर आले आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. घरं वाहून गेल्याचे व्हिडीओही व्हायरल होत आहेत. अशा मुसळधार पावसात एक अभिनेता मनालीमध्ये अडकला आहे. त्याने सोशल मीडियावर याबद्दल माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Himachal Pradesh Rain : उत्तर भारतात पावसाचा कहर, यमुना नदीने ओलांडली धोक्याची पातळी; ‘या’ राज्यांमध्ये भीषण परिस्थिती, वाचा सविस्तर

अभिनेता रुस्लान मुमताज सध्या मनालीमध्ये एका प्रोजेक्टसाठी शूटिंग करत आहे, तिथे तो मुसळधार पाऊस व पुरामुळे अडकला. रुस्लानने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये शहरातील स्थिती आणि तो जिथे अडकला होता त्या ठिकाणच्या परिस्थितीबद्दल सांगितलं. जोरदार पावसामुळे मनाली आणि चंदीगडला जोडणारा रस्ता पुराखाली आहे.

रुस्लानने शेअर केलेल्या व्हिडीओत दिसणारी मनालीतील परिस्थिती

पहिला फोटो पोस्ट करत रुस्लानने लिहिलं, “माझ्या पाठीमागे असलेला रस्ता आता दिसत नाही.” पुढच्या पोस्टमध्ये त्याने रस्ता कसा बुडाला ते शेअर केलं आणि लिहिलं, “हा रस्ता आता अस्तित्वात नाही.”

रुस्लानने शेअर केलेल्या व्हिडीओतील एक क्षण

रुस्लानने पूरग्रस्त ठिकाणाचे काही व्हिडीओ शेअर केले होते. यामध्ये तो जिथे थांबला होता, तेथील परिस्थितीही त्याने दाखवली. व्हिडीओमध्ये रुस्लान गॅरेजसारख्या जागेत आश्रय घेतला होता. तिथे असलेल्या इतर सहकाऱ्यांसोबत तो जेवताना दिसत होता. हेच ‘रात्रीसाठी घर’ असल्याचं त्याने लिहिलं होतं. तसेच त्याने मनाली चंदीगडला जोडणारा रस्ता पुरामुळे वाहून गेल्याचंही सांगितलं.

रुस्लानने शेअर केलेल्या व्हिडीओत दिसणारी मनालीतील परिस्थिती

“मी मनालीमध्ये नेटवर्कशिवाय अडकून पडेन, रस्ते बंद असल्यामुळे घरी परतण्याचा कोणताही मार्ग नाही आणि मी शूटिंग करू शकत नाही, अशा परिस्थितीची मी कल्पनाही केली नव्हती. अतिशय सुंदर ठिकाणी इतकी वाईट परिस्थिती उद्भवली आहे. मी आनंदी व्हावं, दुःखी व्हावं, आभार मानावे, कृतज्ञता व्यक्त करावी की फक्त सफरचंदाचा आनंद घ्यावा, हेही मला कळत नाहीये,” असं रुस्लानने व्हिडीओमध्ये म्हटलं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor ruslaan mumtaz stuck in manali due to floods shares videos himachal pradesh rain hrc
Show comments