‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’चं नवं पर्व चांगलंच चर्चेत आहे. या नव्या पर्वातील नव्या लिटिल चॅम्प्सनी आपल्या गोड आवाजाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे आता प्रत्येक लिटिल चॅम्प्सचा एक वेगळा चाहता वर्ग तयार झाला आहे. या ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ मंचावर दर आठवड्याला काहीना काही तरी खास गोष्ट घडतं असते. या आठवड्यात अशीच एक खास गोष्ट घडली, ती म्हणजे या मंचावर बऱ्याच दिवसांनंतर अभिनेता सागर कारंडे पोस्टमनच्या भूमिकेत आला होता.
हेही वाचा – “…म्हणून माझा भाऊ मला म्हणतो घंटागाडी”; ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीने सांगितली टोपण नावाची यादी
अभिनेता सागर कारंडेला अनेकदा आपण वेगवेगळ्या भूमिकेत पाहिलं आहे. पण त्याची ही पोस्टमनची भूमिका विशेष गाजली. त्यानं पत्र वाचण्याच्या पद्धतीनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. असा हा लोकप्रिय पोस्टमन या आठवड्यात ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या मंचावर ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांच्यासाठी एका खास व्यक्तीचं पत्र घेऊन आला होता. याचा व्हिडीओ झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
सुरेश वाडकरांसाठी एका खास व्यक्तीचं पत्र म्हणजेच आईच पत्र सागर घेऊन आला होता. यावेळी बालपणापासून संघर्ष करत आलेल्या सुरेश वाडकरांच्या आठवणींना उजाळा या पत्राने दिला. हे पत्र ऐकून सुरेश वाडकरसह सर्वजण भावुक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
हेही वाचा – “…असं कोण करत?”; गिरीजा ओकने सांगितला शाहरुख खानचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “अॅटलीच्या वाढदिवसाला त्याने…”
दरम्यान, या व्हिडीओला आतापर्यंत ६० हजारहून अधिक व्ह्यूज मिळाले असून २ हजारहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. “सागर कारंडे पत्राबरोबर अश्रू पण घेऊन येतो”, “सागर दादा खूप सुंदर पत्र वाचन…”, “खरंच शब्दच नाही”, अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.