मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणून संकर्षण कऱ्हा़डेला ओळखले जाते. अभिनयाच्या जोरावर संकर्षणने कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. त्याने विविध मालिकांमध्ये काम करुन अभिनयाचा ठसा उमटवला. उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या संकर्षणचा चाहता वर्गही मोठा आहे. नुकतंच संकर्षणला चाहत्यांनी किंडर जॉय न खाण्याचा सल्ला दिला आहे.
संकर्षण सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. आगामी प्रोजेक्ट्सबरोरच अनेकदा तो खासगी गोष्टींचे फोटोही शेअर करताना दिसतो. सध्या संकर्षणने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तो किंडर जॉय खाताना दिसत आहे.
आणखी वाचा : “बाबा तिथेच सतरंजी टाकून झोपतात कारण…” संकर्षण कऱ्हाडेची ‘ती’ पोस्ट चर्चेत
संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट
“लहानपणी सग्गळ्यात पहिलं आवडलेलं चॉकलेट म्हणजे, “पॉपिन्स”…. मग आवडायचं “किस मी”…. त्यानंतर नंबर लागला “अॅल्पनलीबे”… असं करत करत सध्या मी “किंडर जॉय” खूप खातो.. तू म्हणशील तसंच्या दोन प्रयोगांच्या मध्ये शांतपणे बसून आत्ता ३ खाल्लेत.. मज्जा ..”, अशी पोस्ट संकर्षण कऱ्हाडेने केली आहे.
संकर्षणची ही पोस्ट पाहिल्यानंतर अनेकांनी त्याला किंडर जॉय न खाण्याचा सल्ला दिला आहे. “माझ्या ४ वर्षांच्या मुलीने पाहिलं तर लगेच म्हणेल…किंडर जॉय हे शरीरासाठी चांगले नाही”, अशी कमेंट एका चाहतीने केली आहे. तर “जास्त नको खाऊस पण…. तुझ्या चाहतिचा तुझ्यासाठी एक प्रेमळ काळजीपूर्वक सल्ला”, असे एकाने कमेंट करत म्हटले आहे.
तर एकाने “किंडर जॉय हे शरीरासाठी घातक असते. कृपया खाऊ नका. काळजी घ्या आणि मुलांना पण अजिबात देऊ नकोस”, असे म्हटले आहे.