मराठी मनोरंजन सृष्टीतील एक बहूगुणसंपन्न अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. त्याच्या अभिनयाचे, लिखाणाचे, त्याच्या दिग्दर्शनाचे, त्याच्या कवितांचे, त्याच्या सूत्रसंचालनाचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियावर सक्रिय राहून तो नेहमीच त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करत असतो. आता संकर्षणची एक पोस्ट खूप चर्चेत आली आहे.
संकर्षण नेहमीच विविध पोस्टमधून त्याच्या कामाबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये घडणाऱ्या घडामोडी चाहत्यांची शेअर करत असतो. दोन वर्षांपूर्वीच तो बाबा झाला. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो त्याच्या दोन्ही मुलांबद्दलही प्रेम व्यक्त करत असतो. आता नुकताच संकर्षणने त्याच्या लेकीचा एक गोड फोटो शेअर केला आहे.
आणखी वाचा : Video : “मोठं व्हायची इतकी घाई…” संकर्षण कऱ्हाडेचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत
संकर्षण हा मराठी कलाविश्वातील व्यग्र असलेल्या अभिनेत्यांपैकी एक आहे. तो एकाच वेळी नाटक, मालिका, रिॲलिटी शो अशा विविध माध्यमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. शूटिंगच्या निमित्ताने किंवा नाटकांच्या दौऱ्यामुळे तो अनेकदा घराबाहेर असतो. अशावेळी त्याची दोन्ही मुलं त्याला खूप आठवण काढत असतात. संकर्षणने त्याच्या मुलीचा जो फोटो शेअर केला त्यामध्ये त्याची लेक संकर्षणच्या फोटोशी गप्पा मारत आहे. हा फोटो पोस्ट करत त्याने लिहिलं, “बाबा घरी नसतांना बाबाच्या फोटोशी गप्पा…”
हेही वाचा : “आनंदाची बातमी शेअर करतो…” संकर्षण कऱ्हाडेची ‘ती’ पोस्ट चर्चेत
आता त्याने केलेली ही पोस्ट खूप चर्चेत आली आहे. या फोटोवर कमेंट करत नेटकरी संकर्षणच्या मुलीला त्याच्याबद्दल वाटणारं प्रेम बघून तिचं कौतुक करत आहेत. याच बरोबर ही पोस्ट आवडल्याचं सांगत नेटकरी त्या दोघांमधील बॉण्डिंगचंही कौतुक करत आहेत.