मराठी मालिकाविश्वातील आघाडीचा अभिनेता म्हणजे शशांक केतकर. शशांकने आपल्या अभिनयाने मनोरंजनसृष्टीत एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. तसंच त्याने हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या दमदार अभिनयाची छाप उमटवली आहे. ‘स्कॅम २००३’ (Scam 2003) या हंसल मेहता यांच्या वेब सीरिजमध्ये तो झळकला होता. तसंच लवकरच शशांक प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरच्या वेब सीरिजमध्येही पाहायला मिळणार आहे. अशा या लोकप्रिय अभिनेत्याला कोणत्या बॉलीवूड अभिनेत्रींना डेटवर घेऊन जायला आवडेल? जाणून घ्या…
हेही वाचा – टीआरपीच्या शर्यतीत वरचढ ठरली ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ आलेली कला; जुन्या मालिकांना मागे टाकतं मारली बाजी
नुकताच अभिनेता शशांक केतकरने ‘अल्ट्रा मराठी बझ’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलशी संवाद साधला. यावेळी अभिनेत्याबरोबर रॅपिड फायर खेळ खेळण्यात आला. तेव्हा शशांकला कोणत्या बॉलीवूड अभिनेत्रींना डेटवर घेऊन जायला आवडेल? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अभिनेता म्हणाला की, डेटच ना लग्न नाही करायचं ना. डेट असेल तर आधी मी आलिया भट्टला ट्राय करेन. मग ती नाहीच म्हणाली तर कोंकणा सेन शर्मा, सोनाली बेंद्रे. कारण मला नुसतं सौंदर्य नाही तर त्यांचं अभिनय कौशल्य आवडतं.
हेही वाचा – “…म्हणून अजूनपर्यंत मुलाला सोशल मीडियापासून ठेवलंय लांब”, शशांक केतकरने सांगितलं कारण, म्हणाला, “ऋग्वेद…”
दरम्यान, सध्या शशांक ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुरांबा’ या मालिकेत दिसत आहे. शशांकची ही देखील मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. ‘मुरांबा’ या मालिकेत अभिनेत्याने अक्षय मुकादमची भूमिका साकारली आहे.